VIDEO: कळंगुटमध्ये पर्यटकांपेक्षा तंबाखू-दारु पिऊन फिरणाऱ्यांचीच 'तोबा' गर्दी, सरत्या वर्षाला अशा प्रकारे निरोप; गर्दीचे विदारक वास्तव मांडणारा व्हिडिओ चर्चेत

Calangute Beach Crowd Video: निसर्गरम्य किनारे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
Calangute Beach Crowd Video
Calangute Beach Crowd VideoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: निसर्गरम्य किनारे आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. 2025 या सरत्या वर्षाला निरोप देऊन 2026 या नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देश-विदेशातील पर्यटकांनी गोव्यात प्रचंड गर्दी केली होती. विशेषतः कळंगुट परिसरात पर्यटकांचा महासागर लोटल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या गर्दीच्या उत्साहासोबतच पर्यटकांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी

31 डिसेंबरच्या रात्री गोव्यातील (Goa) प्रत्येक कोपरा पर्यटकांनी ओसंडून वाहत होता. कळंगुट, बागा आणि कांदोळी यांसारख्या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. 2026 चे स्वागत करण्यासाठी हॉटेल, शॅक आणि पब पूर्णपणे हाऊसफुल्ल झाले होते. प्रशासनानेही या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Calangute Beach Crowd Video
Viral Video: 'कांड' करायला गेला अन् भलतचं होऊन बसलं! चिमुरड्याचा निशाणा चुकला आणि आजोबांना बसला जबरदस्त फटका; व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट

व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

जल्लोषाच्या या वातावरणात सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कळंगुटमधील पर्यटकांच्या गर्दीचे चित्रण करण्यात आले असून व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने तेथील विदारक वास्तव मांडले. या व्हिडिओनुसार, नवर्षाच्या स्वागतासाठी कळंगुटमध्ये पर्यटक कमी आणि तंबाखू, दारुच्या नशेत धिंगाणा घालणारे लोकच जास्त दिसत होते. रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत बोंबलत फिरणारे तरुण आणि सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमुळे गोव्याच्या पर्यटनाची प्रतिमा मलीन होत असल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे.

Calangute Beach Crowd Video
Viral Video: धक्का लागताच मेट्रोत दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, केस ओढत एकमेकींना बदडले; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, 'रिअ‍ॅलिटी शो पेक्षाही डेंजर'

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी गोव्यातील पर्यटनाचा दर्जा खालावत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर, पर्यटकांच्या अशा वर्तणुकीमुळे स्थानिक नागरिकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एकूणच, 2026 चे स्वागत करण्यासाठी गोव्यात आलेले पर्यटक आणि तिथे निर्माण झालेली स्थिती यामुळे पर्यटन विभाग आणि स्थानिक प्रशासन आता अशा हुल्लडबाजांवर काय कडक पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com