Portuguese Laws : पोर्तुगीज कायद्यांमध्ये सुधारणा करणे गरजेचे : ॲड. शैलेश कुलकर्णी

Portuguese Laws : प्रोबस क्लब फोंडातर्फे ‘मृत्युपत्र’वर कार्यशाळा
goa
goaDainik Gomantak
Published on
Updated on

बोरी, ब्रिटीशकालीन कायद्यांमध्ये केंद्र सरकारकडून जर सुधारणा केली जाऊ शकते तर पोर्तुगिजांचे कालबाह्य कायदे विशेषतः कम्युनियन ऑफ असेट हा कायदा रद्द होऊन त्याजागी सुटसुटीत भारतीय वारसा कायदा अंमलात आणणे गरजेचे आहे.

सध्याच्या कायद्यामुळे मालमत्ता नावावर करणे फार खर्चिक, वेळखाऊ व जिकिरीचे बनले आहे. राज्य सरकारने या पोर्तुगीज कायद्यांमध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याचे ॲड. शैलेश कुलकर्णी यांनी नमूद केले.

ॲड. कुलकर्णी यांनी ‘मृत्युपत्र का व कशासाठी करावे’ याविषयी सविस्तर माहिती दिली. फोंडा येथील प्रोबस क्लब हिलटाऊनतर्फे ‘मृत्युपत्र आणि त्याचे फायदे’ याविषयावर ॲड. शैलेश कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

goa
Para Badminton World C'Ships: भारताच्या यथिराज, प्रमोद अन् कृष्णाने उचांवली तिरंग्याची शान, सुवर्ण पदकावर कोरले नाव

त्यावेळी ते बोलत होते. प्रोबस क्लबच्या कार्यालयात झालेल्या या व्याख्यानाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. उमेश दाणी उपस्थित होते.

मृत्युपत्र आणि आपला मृत्यू तसेच मृत्युपत्र आणि गिफ्ट डीड याबाबत ज्येष्ठ नागरिकांमध्ये काही मूलभूत गैरसमज या कार्यशाळेतून दूर होतील, असे प्रा. उमेश दाणी म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक कृष्णनाथ तळावलीकर यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश आमोणकर यांनी केले.

जुन्या कायद्यामुळे नोंदणी कार्यालय, न्यायालयांच्या कामाचा भार वाढत आहे. शिवाय डिस्पोझेबल व नॉनडिस्पोझल या भानगडीत अनेक कुटुंबे भरडली जातात. त्यासाठी हे जुने कायदे मोडीत काढून सुटसुटीत कायदे आणणे काळाची गरज आहे. कोर्ट इन्व्हेंटरी सक्सेशन डीड या खर्चिक गोष्टींवर त्यामुळे रजिस्टर्ड व्हील हा एकमेव उपाय आहे.

- ॲड. शैलेश कुलकर्णी, व्याख्याते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com