Goa Navratri Celebration 2023 : मडगावात १०७ वा शारदोत्सव ; आज श्रींची मिरवणूक, नंतर पाटी पूजा

२४ रोजी सकाळी ८ वा. श्रींची मिरवणूक श्री दामोदर विद्याभुवन कोंब येथून बॅंड पथकासोबत निघेल व परत आल्यावर श्रींची विधिवत स्थापना केली जाईल.
Goa Navratri Celebration 2023
Goa Navratri Celebration 2023Dainiik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Navratri Celebration 2023 : सासष्टी, १९१६ साली स्थापना झालेल्या श्री सरस्वती सेवक मंडळाचा १०७ वा शारदोत्सव २४ ते गुरुवार २६ ऑक्टोबर असे तीन दिवस भरगच्च कार्यक्रमानिशी साजरा होणार आहे.

२४ रोजी सकाळी ८ वा. श्रींची मिरवणूक श्री दामोदर विद्याभुवन कोंब येथून बॅंड पथकासोबत निघेल व परत आल्यावर श्रींची विधिवत स्थापना केली जाईल.

त्यानंतर पूजाअर्चा व पाटीपुजनाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी ६ वाजता श्री सत्यसाई सेवा समिती मडगाव तर्फे भजनाचा कार्यक्रम होईल.व ८ वाजता तीर्थप्रसाद होईल.

दुसऱ्या दिवशी बुधवार, २५ रोजी सकाळी पूजाअर्चा, आरत्या व तीर्थप्रसाद व संध्याकाळी ५.३० वा. श्री दामोदर संगीत विद्यालयातर्फे गुरु गौरव व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कनक’ सभे अंतर्गत पद्मभूषण कै. डॉ. कनक रेळे यांना समर्पित कार्यक्रम होणार आहे.

त्या नंतर ७ वाजता ‘गीतांजली’ हा संगीत कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात पुणे येथील प्रख्यात गायिका धनश्री फडके नाखे तसेच गोव्याचा सुप्रसिद्ध गायक नीलेश शिंदे, नवीना दाभोलकर भावगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत.

त्यांना सिन्थेसाईजरवर सुरेश घाडी, हार्मोनियमवर प्रसाद नाईक, तबल्यावर चंद्रकांत गडकर, पखवाजवर मयुर नाईक साथ संगत करेल. अभिश्री मेणसे कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन करणार आहेत. त्यानंतर ९ वाजता आरत्या व तीर्थप्रसाद होईल.

Goa Navratri Celebration 2023
Goa Cruise Vessels: यंदाच्या पर्यटन हंगामात गोव्यात येणार 31 आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजे

या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सरस्वती सेवक मंडळाचे अध्यक्ष शैलेश जयराम कारे यांनी केले आहे. हा उत्सव नारायण गोपाळ विर्जीनकर, वैकुंठ विष्णू कारे, रामचंद्र विश्र्वनाथ सांबारी व राणू दत्ता नायक यांच्या कुटुंबीयांतर्फे साजरा केला जाणार आहे.

गुरूवारी ‘रजनीगंधा’चे आयोजन

शारदोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवार २६ रोजी सकाळी पूजा, आरत्या, तीर्थप्रसाद व संध्याकाळी ६ वा. श्री दामोदर संगीत विद्यालयातर्फे गुरु गौरव

व्यास व विद्यार्थ्यांतर्फे ‘शास्त्रपूजा -शास्त्रीय नृत्याची परंपरा’ हा नृत्य कार्यक्रम व तदनंतर मडगाव महिला मंडळातर्फे ‘रजनीगंधा’ हा कार्यक्रम सादर केला जाईल. तदनंतर आरत्या, तीर्थप्रसाद व पावणीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Lenyadri Girijatmaj Temple History
Theur Chintamani Temple History
Goa Dairy management takeover by NDDB
Ganesh Chaturthi Spiritual Significance Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com