
Goa Navratri Celebration 2023 : पणजी, पणजी गुजराती समाजातर्फे आयोजित अखिल गोवा दांडिया आणि गरबा स्पर्धेला युवक- युवतींसह महिला - पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
पणजी जिमखान्याच्या हॉलमध्ये कला व संस्कृती खाते आणि पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी गुजराती समाजाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. दै. गोमन्तक प्रायोजक असलेल्या या स्पर्धेचा रविवारी शेवटचा दिवस होता.
नवरात्रीनिमित्त गुजराती समाजातर्फे दांडिया आणि गरबा नृत्याचे आयोजन केले जाते. दरवर्षी पणजी गुजराती समाजाच्यावतीने हा उपक्रम राबविला जातो.
स्पर्धेच्या निमित्ताने आज पणजी परिसरासर आजूबाजूच्या ठिकाणी राहणारे गुजराती बांधव या दांडिया नृत्यात सहभागी झाले होते.
गुजराती लोकांचा हा नृत्य प्रकार असल्याने खास पारंपरिक पेहराव करून आलेल्या युवक-युवती लक्ष वेधून घेत होते. दांडिया आणि गरबा नृत्यासाठी आवश्यक असलेल्या पेहरावाबरोबर विशेष दांडियाही नृत्यात दृष्टीस पडत होत्या.
आज उपस्थिती
मान्यवरांची आज उपस्थिती
लता पारेख अध्यक्ष असलेल्या पणजी गुजराती समाजतर्फे या स्पर्धेचे नेटके आयोजन केले.
सोमवारी पणजी कम्युनिटी हॉलमध्ये दांडिया आयोजला असून त्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत व केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला हे उपस्थित राहतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.