Crime News: भरदिवसा सुरीने हल्ला; सूरज कसबेचा जामीन अर्ज फेटाळला, न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Nasnola Knife Attack: नास्नोळा येथे भरदिवसा झालेल्या सूरी हल्ला प्रकरणातील संशयित सूरज विजय कसबे (२८, मूळ रा. सोलापूर, महाराष्ट्र) याचा जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
Nasnola Knife Attack
Crime NewsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: नास्नोळा येथे भरदिवसा झालेल्या सूरी हल्ला प्रकरणातील संशयित सूरज विजय कसबे (२८, मूळ रा. सोलापूर, महाराष्ट्र) याचा जामीन अर्ज म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. हा प्रकार केवळ ‘रोड रेज’ नसून पूर्वनियोजित हल्ल्यासारखा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० च्या सुमारास नास्नोळा येथील गणपती मंदिराजवळ ही घटना घडली होती. रस्त्यावरील वादातून थिवी येथील मंथन आगरवडेकर (२५) आणि सहआरोपी रवी लक्ष्मण नाईक यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर रवीने दूरध्वनी करून सूरजला घटनास्थळी बोलावले. सूरज स्कूटरवरून चाकू घेऊन तेथे आला आणि त्याने मंथनच्या पाठीत सुऱ्याने गंभीर वार केले, असा आरोप आहे.

Nasnola Knife Attack
Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी सूरज कसबे आणि रवी नाईक यांना अटक केली होती. गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिव्हा स्कूटर आणि चाकूही जप्त करण्यात आला होता. आरोपीच्या वकिलांनी हा प्रकार तात्कालिक वादातून घडल्याचा दावा केला.

गुन्ह्यातील हत्यार आणि वाहन जप्त करण्यात आले असून, आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने त्याला जामीन द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, सरकारी पक्षाने जामिनाला विरोध केला. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने नमूद केले की, सूरजचा पीडिताशी आधी कोणताही वाद नव्हता.

Nasnola Knife Attack
Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

सहआरोपीच्या सांगण्यावरून तो चाकू घेऊन घटनास्थळी आला आणि सार्वजनिक ठिकाणी त्याने थेट हल्ला केला. अशा गंभीर स्वरूपाच्या कृत्याबद्दल जामीन दिल्यास समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com