'नरकासुर' स्‍पर्धेत नियम धाब्यावर! रस्त्यावर अर्धवट सांगाडे, रात्रभर गोंगाट; पोलिसांकडून 'ॲक्शन' नाहीच

Goa Narakasura Competitions: रात्री दहानंतर मोठ्या आवाजातील ध्‍वनिक्षेपक लावून ध्‍वनि प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घ्‍यावी, असा स्‍पष्‍ट आदेश न्‍यायालयाने देऊनही दक्षिण गोव्‍यात कित्‍येक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मोठ्या गोंगाटात नरकासुर स्‍पर्धा चालू होत्‍या.
Goa Narakasura Competitions: रात्री दहानंतर मोठ्या आवाजातील ध्‍वनिक्षेपक लावून ध्‍वनि प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घ्‍यावी, असा स्‍पष्‍ट आदेश न्‍यायालयाने देऊनही दक्षिण गोव्‍यात कित्‍येक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मोठ्या गोंगाटात नरकासुर स्‍पर्धा चालू होत्‍या.
Narakasura GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Diwali Narakasura Festival Turns Chaotic Due to Lack of Noise Control Measures

मडगाव: रात्री दहानंतर मोठ्या आवाजातील ध्‍वनिक्षेपक लावून ध्‍वनि प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घ्‍यावी, असा स्‍पष्‍ट आदेश न्‍यायालयाने देऊनही दक्षिण गोव्‍यात कित्‍येक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मोठ्या गोंगाटात नरकासुर स्‍पर्धा चालू होत्‍या. काही स्‍पर्धा अगदी पहाटेपर्यंत चालल्या. मुख्‍य म्‍हणजे यापैकी कुणावरही पोलिसात गुन्‍हा नोंद झालेला नाही.

दिवाळीच्‍या पूर्वसंध्‍येला दक्षिण गोव्‍यात मडगाव, फातोर्डा, वास्‍को, फोंडा, शिरोडा, कुडचडे आदी विविध ठिकाणी नरकासुर स्‍पर्धा पहाटेपर्यंत चालल्‍या होत्‍या. बऱ्याच स्‍पर्धेच्‍या ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत लावले होते. पोलिस बंदोबस्‍त असतानाही हे सर्व प्रकार चालू होते. त्‍यामुळे आता याची दखल न्‍यायालय कशी घेणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिलेली आहे.

स्‍पर्धेतील पथके देखील ढोलताशांच्‍या गजरात नाचत होती. त्‍यामुळे रात्री उशिरापर्यंत ध्‍वनिप्रदूषण सुरु होते. रात्री दहानंतर मोठ्या आवाजात ध्‍वनिप्रदूषण केल्‍यास कायद्याअंतर्गत कारवाई करण्‍यात येणार असा इशारा दिला होता. खास करून वृद्ध नागरिकांना रात्रीच्‍या वेळी ध्‍वनिप्रदूषणाचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून कडक कारवाई करण्‍याचा इशारा सरकारने दिला होता.

पोलिसांची कृती दिसली नाही

सर्वोच्‍च न्‍यायालयानेही यापूर्वी ध्‍वनिप्रदूषणाबाबत दिलेल्‍या आदेशाचेही पालन झाले नाही. कित्‍येक ठिकाणी राजकारण्‍यांनी स्‍पर्धा पुरस्‍कृत केल्‍या होत्‍या. त्‍यामुळे पोलिसांनी ध्‍वनिप्रदूषण रोखण्‍याच्‍या दिशेने कोणतीच कृती केली नाही.

म्हापसा शहरातदेखील लेझर शो; वाहनचालकांना त्रास!

दीपावलीच्या पूर्वसंध्येला म्हणजे नरक चतुदर्शीच्या रात्री राज्यात नकरासुर बनवून त्याचे पहाटे दहन करण्याची प्रथा आहे. या प्रतिमा जवळ कर्णकर्कश आवाजात संगीत लावून नुसता हैदोस घातला जातो. यंदाही शहरात तसेच आसपासच्या भागात नियमांचे उल्लंघन करीत, ध्वनी प्रदूषण झाल्याचे पाहायला मिळाले.

शहरांमध्ये पोलिसांनी संगीताचा आवाज कमी ठेवण्यास आयोजकांना सांगितले होते. मात्र त्याचा जास्त परिणाम झाला नाही असे दिसले. मध्यरात्री नंतर देखील काही बड्या आयोजन स्थळी मोठमोठ्याने संगीत तसेच ढोल वाजवून कायद्याचे सर्रास उल्लंघन झाले.

म्हापसा शहरातील मध्यभागात उभारण्यात आलेल्या नरकासुरांजवळ मोठ्या म्युझिक सिस्टीम लावून दुपारपासूनच धिंगाणा सुरू झाला होता. तसेच लेजर शो देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. या लेझर लाईटमुळे समोरील वाहन दिसत नव्हते. हा प्रकार रात्रभर सर्वत्र दिसला. दरम्यान, नरकासुर प्रतिमांचे दहन रस्त्यांच्या बाजूला करण्यात आले. यावेळी काहींनी नरकासुरांच्या प्रतिमांचे सांगाडे हटविण्यात आलेले, तर काही भागात जैसे थे होते.

Goa Narakasura Competitions: रात्री दहानंतर मोठ्या आवाजातील ध्‍वनिक्षेपक लावून ध्‍वनि प्रदूषण होऊ नये याची खबरदारी घ्‍यावी, असा स्‍पष्‍ट आदेश न्‍यायालयाने देऊनही दक्षिण गोव्‍यात कित्‍येक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मोठ्या गोंगाटात नरकासुर स्‍पर्धा चालू होत्‍या.
Narkasur Making In Goa: गोव्यात दिवाळीची लगबग सुरु, नरकासुर तयारीने धरला जोर; गोमंतकीयांचा उत्साह शिगेला!

नरकासुराचे लोखंडी सांगाडे होते रस्त्यांवर

अनिष्ट प्रवृत्तीचे प्रतीक असलेल्या नरकासुरांचे सर्वत्र दहन करून सर्वत्र दिवाळीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. मात्र विविध भागात नरकासुराचे लोखंडी सांगाडे अजूनही रस्त्याच्या बाजूला पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे.

रस्त्याच्या बाजूने अस्ताव्यस्त अवस्थेत पडून असलेल्या या सांगड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला असून हे सांगाडे काढण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवाळीच्या पहाटे सर्वत्र रस्त्याच्या बाजूने नरकासुराच्या प्रतिमा जाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे सांगाड्यांसह अर्धवट अवस्थेत जळालेले नरकासुर प्रतिमांचे अवशेषही पडून आहेत. अलीकडच्या काही वर्षांत नरकासुर प्रतिमा तयार करण्याचे प्रस्थ वाढले आहे. शहरातील गल्लोगल्ली आणि गावोगावी नरकासुर प्रतिमा करण्यात येतात. बहुतेक ठिकाणी लोखंडी सांगाड्यांचा वापर करून अवाढव्य नरकासुर प्रतिमा उभ्या केल्या जातात.

या प्रतिमा दहन केल्यानंतर लाकडी सांगाडे जळतात मात्र लोखंडी सांगाडे तसेच राहतात. हे सांगाडे वेळीच बाजूला करण्याकडे दुर्लक्ष होत असते. यंदाही डिचोलीत सर्वत्र रस्त्याच्या बाजूने लोखंडी सांगाडे पडून असल्याचे चित्र दिसत आहे. हे सांगाडे धोकादायक बनत असून सांगाड्यांमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com