Goa Miunicipality: गोवा महापालिकेकडून एका महिन्यातच 'अडीच कोटींची' करवसुली

Goa Miunicipality: महापालिकेने अनेकांची लाखो रुपयांची थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या आहेत.
Tax Collection
Tax Collection Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Miunicipality: महापालिकेने नोव्हेंबर महिन्यात विविध करवसुलीच्या माध्यमातून अडीच कोटी रुपयांची वसुली केल्याची माहिती लेखा व कर अधिकारी सिद्धेश नाईक यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिली. महापालिकेची 50 कोटींवर थकबाकी असल्याने हा विषय सतत मासिक सभेत चर्चेचा विषय ठरला आहे. या वसुलीसाठी महापालिकेने पथकेही निर्माण केली. ज्या जोमाने या पथकांकडून काम होणे अपेक्षीत होते, ते झाल्याचे दिसत नाही.

घरपट्टी आणि सॅनिटेशन कर वसुलीपोटी महापालिकेने नोव्हेंबरमध्ये 2 कोटी 10 लाख 65 हजार 35 रुपये वसूल केले, तर 32 कोटी 84 लाख 4 हजार 156 एवढे थकीत आहे. त्याशिवाय व्यावसायिक परवाना, सॅनिटेशन कर वसुलीपोटी 45 लाख 10 हजार 602 रुपये वसूल झाले असले, तरी अद्याप 17 कोटी 97 लाख 88 हजार 644 रुपये थकले आहेत.

Tax Collection
Goa Mining: 'गोव्यात खाणी सुरु करुन स्थानिकांना व्यवसाय देणार'- विश्वजीत राणे

महापालिकेची अद्याप 50 कोटी 81 लाख 92 हजार 800 रुपयांची थकबाकी असून ती पुढील चार महिन्यांत वसूल करण्याचे आव्हान पथकांसमोर असणार आहे. अनेकांची लाखो रुपयांची थकबाकी आहे, त्यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असल्याचे नाईक म्हणाले.

वसुली मोहीम कडक करण्याबाबत आपण आयुक्त आग्नेल फर्नांडिस व निरीक्षकांशी चर्चा करणार आहोत. एवढी मोठी रक्कम वसूल झाल्यास महापालिकेला कर्मचाऱ्यांचे वेतनही त्यातून देता येणे शक्य होईल असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com