24 तासांत 77 हरकतींचा निपटारा? 'एवढी घाई का?'; निवडणूक आयोगाला कोर्टाचा सवाल

Goa Municipal Ward Delimitation Case: नगरपालिका प्रभागरचनेवरील ७७ हरकतींचा अवघ्या २४ तासांत निपटारा कसा केला, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला केला आहे.
Goa Municipal Ward Delimitation Case
Goa High CourtDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: नगरपालिका प्रभागरचनेवरील ७७ हरकतींचा अवघ्या २४ तासांत निपटारा कसा केला, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला केला आहे. १२ नगरपालिकांमधील एवढ्या हरकतींवर एका दिवसात सखोल विचार करून निर्णय घेणे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करत न्यायालयाने प्रभागरचना प्रक्रियेतील घाई आणि पारदर्शकतेच्या अभावावर बोट ठेवले.

सुनावणीदरम्यान आयोगाने न्यायालयाला सांगितले की, २४ ऑगस्टला शेवटची हरकत प्राप्त झाली. त्यानंतर २ सप्टेंबरला उपजिल्हाधिकाऱ्यांकडून नकाशा मिळाला आणि ३ सप्टेंबरला ७७ हरकतींवर विचार करून त्यांचा निपटारा करण्यात आला. त्यानंतर ४ सप्टेंबरला अंतिम फाईल पुढे पाठवण्यात आली. या वेळेच्या गणितावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात या प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखांचा स्पष्ट उल्लेख का नाही, अशी विचारणाही न्यायालयाने केली.

Goa Municipal Ward Delimitation Case
BJP Goa: 'सेवा ज्योती'ने दाखवली भाजपची ताकद; CM सावंत-नाईकांसह मंत्री, आमदार रस्त्यावर, 4 महिन्यांवरच्या निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन

प्रभागरचना प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि हलगर्जीपणा झाल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आयोगाला चुका दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. नकाशे, छाननी अहवाल आणि ७७ हरकती निकाली काढल्याचा आदेश यांसह संपूर्ण फाईल शुक्रवारी, जास्तीत जास्त सोमवारी राज्य सरकारकडे पाठवावी, असे निर्देश देण्यात आले. राज्य सरकार आणि निवडणूक आयोगामधील ‘प्रभावी सल्लामसलत’ पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचेही न्यायालयाने निर्देश दिले. घाईघाईने निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमुळे बाधित नागरिकांना न्यायालयात दाद मागण्यासाठी पुरेशी संधी मिळते का, यावरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

निवडणूक आयोगाचा हेतू ‘साफ’

दुसऱ्या बाजूला, पालिका निवडणुका लांबवून त्या सर्वसाधारण निवडणुकीनंतरच घेण्याचा हा ठरवून केलेला डाव असल्याचा गंभीर आरोप मूळ याचिकाकर्ते ट्रोजन डिमेलो यांचे वकील अभिजीत गोसावी यांनी युक्तिवादादरम्यान केला. यापूर्वी निवडणूक ४ जानेवारी २०२७ पूर्वी घेण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता आणि यामध्ये डिमेलो हे एक याचिकाकर्ते होते. गोसावी यांच्या आरोपावर उत्तर देताना निवडणूक आयोगाचे ॲड. सोमनाथ कर्पे यांनी आयोगाचा हेतू पूर्णपणे साफ आणि योग्य असल्याचा दावा केला.

घटनाक्रम असा...

२४ ऑगस्ट : शेवटची हरकत प्राप्त झाली.

२६ ऑगस्ट : फाईल उपजिल्हाधिकाऱ्यांकडे

२ सप्टेंबर : नकाशा परत प्राप्त झाला

३ सप्टेंबर : हरकतींवर विचार व निकाल

४ सप्टेंबर : फाईल पुढे पाठवण्यात आली

९ सप्टेंबर : प्रभाग अधिसूचना जारी

Goa Municipal Ward Delimitation Case
Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

विनाकारण त्रुटी काढत नाही : न्यायालय : ‘आम्ही विनाकारण तुमच्या आदेशात त्रुटी काढत नाही. चुका झाल्या आहेत. राज्य सरकारकडे मोठी यंत्रणा आहे. पुनरावृत्ती टाळा आणि चुका दुरुस्त करून प्रभागांची समान रचना करा,’ असे न्यायालयाने नमूद केले. आयोगाचे पुढील वर्तन आणि दुरुस्त केलेली प्रक्रिया लक्षात घेऊन या प्रकरणावर अंतिम आदेश दिला जाणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, याबाबतच्या आदेशाची प्रत गुरुवारपर्यंत देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने आज बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com