

वाळपई: बायकडे, भुईपाल येथील सरकारी प्राथमिक शाळेजवळ भरत गणेश वर्नकर यांच्या घराला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी पहाटे सुमारे २.३५ वाजता घडली.
आगीत घरातील इलेक्ट्रीक स्कूटर (जीए-०४-एन-७४९३), दोन शिवण मशीन, वॉशिंग मशीन, सायकल, घराचे पत्रे तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. आग लागली तेव्हा वर्नकर कुटुंबिय घरात झोपले होते. आग व धुरामुळे ते जागे झाले व बाहेर पडले.
लगेच वाळपई अग्निशमन दलाला कळविण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत घरातील बहुतेक साहित्य जळून खाक झाले होते. घरावरचे पत्रेही जळून खाक झाले. अग्निशमन दलाने पाणी टाकून आग पूर्णपणे विझवली.
या आगीत एकूण ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे सुमारे २ लाख रुपयांची मालमत्ता वाचविण्यात यश आले आहे.आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. अग्निशमन अधिकारी कृष्णा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी दक्षतेने मदतकार्य केले.
या मोहिमेत अग्निशमन दलाचे कृष्णा सी. नाईक, तुळशीदास झर्मेकर, रामा नाईक, रूपेश गावकर, चारुदत्त पाल, आनंद शेटकर, आणि फटी कलमीसकर यांनी सहभाग घेतला. दरम्यान, वाळपई पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.