Goa-Moscow Flight: हंगामातील पहिले रशियन चार्टर गोव्यात दाखल; गोवा-मॉस्को विमानसेवा सुरू

ही सेवा दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चालविली जाईल
Goa-Moscow Flight
Goa-Moscow FlightDainik Gomantak

हंगामातील पहिले रशियन चार्टर विमान मॉस्कोहून गोव्यात आले आहे. रशियन सरकारच्या मालकीच्या ‘एरोफ्लॉट’ या विमान कंपनीने शनिवारपासून मॉस्को आणि एकटेरिनबर्ग येथून गोव्यासाठी थेट उड्डाण सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Goa-Moscow Flight
Goa Monsoon Update: काजूगट्टो गावाला जोडणारा पूल गेला वाहून! धुव्वाधार पावसामुळे नागरिक हैराण

ही सेवा दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चालविली जाईल, असे ‘एरोफ्लॉट’ने म्हटले आहे. गोव्याव्यतिरिक्त रशियन वाहक मॉस्को ते दिल्ली थेट उड्डाणे देखील सुरू करण्यात येणार आहे. भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय करारानुसार, 30 सप्टेंबरपासून शेरेमेत्येवो विमानतळावरून तीन साप्ताहिक उड्डाणे मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारी वाईड-बॉडी एअरबस ए-330 चालवली जातील.

Aerofloat SU236 फ्लाइट सुमारे 255 आंतरराष्ट्रीय प्रवाशांसह आज (01 ऑक्टोबर) सकाळी 5:30 वाजता दाबोळी विमानतळावर पोहोचले.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस कमकुवत बनत चालली आहे. त्‍याचा परिणाम गोव्‍याच्‍या पर्यटनावर झाला आहे. रशियन पर्यटक मोठ्या प्रमाणावर खर्च करतात.

त्याचा फायदा किनारी भागातील व्‍यावसायिकांना होत होता. पण आता ती स्‍थिती राहिलेली नाही. किनारी भागातील हॉटेल्‍स, रेस्टॉरंट्‌स, गेस्ट हाऊसवर नजर मारली तर देशी पर्यटकांची संख्या जास्‍त दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com