Goa: पुरातन वारसा नष्ट न करता नुतनीकरण करण्याचा मुरगाव पालिकेने घेतला निर्णय

शहरातील पार्किंग व्यवस्थेवर सुसूत्रता आणण्यासाठी शहरात पे पार्किंग सुविधा उपलब्ध करण्याचा ठराव घेण्यात आला.
Murgaon Municipality
Murgaon MunicipalityDainik Gomantak

दाबोळी: मुरगाव पालिका (Murgaon Municipality) मंडळाच्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.तर काही विषयांवर अभ्यास करण्यासाठी समित्या निवडण्यात आल्या.यात मुरगाव पालिकेचे पुरातन वारसा नष्ट न करता नुतनीकरण करण्यात यावे असा ठराव घेण्यात आला. तर शहरातील पार्किंग व्यवस्थेवर सुसूत्रता आणण्यासाठी शहरात पे पार्किंग सुविधा उपलब्ध करण्याचा ठराव घेण्यात आला.

Murgaon Municipality
Goa: कोकणी भाषा मंडळाचा 59वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

पे पार्किंगसंबंधी चर्चा करण्यात आली. जुने बसस्थानक, कुन्हा चौक येथे दुचाकी तर पालिका इमारतीसमोरचा रस्ता येथे चारचाकी वाहनांसाठी पे पार्किंग करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिस कक्षाने पाठविला होता. तथापी पे पार्किंग करण्याऐवजी वेडेवाकडे वाहने उभी करून जागा अडविणारया वाहनचालकांमध्ये शिस्त आणण्याची गरज शमी साळकर यांनी व्यक्त केली.सध्या महामारीमुळे लोकांकडे पैसा नाही.त्यामुळे पे पार्किंगसंबंधी निर्णय घेऊ नये असे काहीजणांनी सांगितले. येथील बेवारस वाहने हटविण्यासंबंधी वाहतूक पोलिसांकडून आलेल्या पत्रावर चर्चा झाली. संबंधित बेवारस वाहने हटविल्यावर ती ठेवण्यासाठी मोकळी जागा पालिकेकडे नसल्याचे उत्तर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Murgaon Municipality
Goa: अडवई सत्तरीतील सिलिंडर स्फोटात घर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

येथे मासळी मार्केटाची इमारत बांधण्यात येणार असल्याने तेथील विक्रेत्यांना देव दामोदर ट्रस्टच्या जागेवर हलविण्यात येणार आहे. तेथे शेड बांधण्याचे काम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. सदर जागा महसूल खात्याकडे असल्याने त्या जागेच्या भाड्यापोटी दरवर्षी सुमारे पाच लाख रूपये भाडे द्यावे असे पत्र पाठविले आहे. मात्र सदर भाडे कंत्राटदाराने फेडावे असे नगरसेवकांनी सांगितले.यावेळी गिरिष बोरकर यांनी पालिकेकडे कामगाराचे वेतन देण्यासाठी पैसे नाही आणि पाच लाख रुपये कोठून आणणार असे विचारले. त्यामुळे संतापलेले नगराध्यक्ष कासकर यांनी आपण नगराध्यक्षपदाचा ताबा घेतल्यापासून कामगारांना नियमित वेतन मिळत असल्याचे सांगितले.

Murgaon Municipality
Goa Election: कुडतरी मतदारसंघात कौल कुणाच्या बाजूने?

दरम्यान मुरगाव पालिकेच्या नुतनीकरणाचे काम सद्या युध्द पातळीवर सुरू असून या कामाविषयी नगरसेविका शमी साळकर यांनी आक्षेप घेऊन सदर इमारतीचे पुरातत्व वारसा नष्ट होऊ न देता सदर इमारतीचे नुतनीकरण करण्यात यावे असा सल्ला दिला.याला नगरसेवक यतिन कामूर्लेकर व गिरीश बोरकर यांनी दुजोरा दिला.सदर इमारतीचे छप्पर पुर्वीचे टाईल्स बसवून कौलारू करण्यात यावे अशी मागणी केली.याविषयी आपण पालिका मंडळ व सुडा अधिकारी वर्गाची बैठक बोलावून याविषयी सुचना करण्यात येईल असे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com