Goa Monsoon Updates: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर बरसणार

गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता बघता ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आलाय
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak

पणजी: सगळीकडे पावसाने (Rain) पुन्हा जोर धरला आहे, बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचे क्षेत्र (Low pressure area) तयार झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रविवारपासून गोव्यात (Goa) मुसळधार पावसाची शक्यता हवामान वेधशाळेने वर्तविली आहे. त्‍यामुळे ‘यलो अलर्ट’ (yellow alert) जारी केला आहे. तसेच त्यापुढील काही दिवस पावसाचा जोर वाढेल. मात्र, तो कधी ओसरेल, याबाबत कोणताच अंदाज वेधशाळेने सध्‍या वर्तविलेला नाही. गणेश चतुर्थी काळातदेखील मुसळधार पाऊस बरसण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे भक्तांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी पहाटे पणजी शहर परिसरासह पेडणे ते काणकोण, वाळपईत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. पणजीत दोन तासांत 1.6 इंच (41 मि.मी.) पावसाची नोंद झाल्‍याचे हवामान वेधशाळेने म्हटले आहे.

Goa Monsoon Update
World Coconut Day: माझ्या गोव्याच्या भूमीत... गड्या नारळ मधाचे...

ऑॅगस्ट महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 13.4 इंच पावसाची तूट झाली आहे. ऑॅगस्ट महिन्याची सरासरी 27.7 इंच इतकी आहे. महिनाभरात 14.2 इंच पावसाची नोंद झाली. ऑॅगस्टमध्ये 50 टक्के कमी पाऊस झाला.

- एम. राहुल, हवामान खात्याचे प्रभारी संचालक.

गोव्यात (Goa) गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत पावसाचा (Rain) जोर वाढला असून सोमवारी 21.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्याचबरोबर कोकण, रायगड परिसरातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com