Goa Monsoon : मान्सूनची राज्यात हजेरी; व्यावसायिकांनी शॅकस् गुंडाळले

Goa Monsoon : असे असूनही जोरदार पावसाच्या हजेरीमुळे सर्व शॅक चालकांनी आपले शॅकस् हटवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
Goa Monsoon
Goa MonsoonDainik Gomantak

Goa Monsoon :

पणजी, राज्यात मान्सूनच्या हजेरीमुळे शॅकचालकांनी आवरते घेतल्याचे दिसून आले. गेल्यावर्षी शॅक चालकांना शॅक व्यवसाय उभारणीसाठी सरकारकडून परवाने मिळण्यात बराच काळ वाया गेला होता.

असे असूनही जोरदार पावसाच्या हजेरीमुळे सर्व शॅक चालकांनी आपले शॅकस् हटवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 पाऊस सुरू होत असल्याने राज्याच्या किनाऱ्यावरील, शॅकच्या  परवान्यांची मुदत (ता. ३१ मे) संपली असली, तरी शॅक हटवण्यासाठी सरकार मुदतवाढ दिली होती. बाणावलीचे आमदार वेंन्झी व्हिएगस यांनी पत्र पाठवून पाऊस लांबल्याने शॅकची आवराआवर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

Goa Monsoon
Panaji Rain Update : राज्‍यात मुसळधार पावसामुळे पडझड, अपघात, बत्ती गुल

याविषयी पर्यटन विभाग संचालक सुनिल कुमार आंचिपका(आयएएस) यांनी सांगितले की, शॅक परवान्यांची मुदत ३१ मे ला संपली होती. त्यामुळे सर्व शॅक चालकांना त्यांचे शॅक काढून टाकण्याचे आदेश दिले गेले होते. आमच्याकडे उपलब्ध माहितीनुसार सध्या एकही शॅक कार्यरत नाही.

राज्यात जोरदार वारे आणि पाऊस पडल्याने बहुतेक शॅक चालकांनी त्यांचे शॅक हटवले आहेत. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सरकारचा शॅक  हटवण्याबाबतचा निर्णय हवामान खात्याच्या माहितीवर अवलंबून आहे, असे सांगितले होते,असे कार्दोझ म्हणाले.

शॅक  परवाने हे ३१ मे पर्यंतच्या मुदतीसाठी दिले जातात. देशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येऊ लागले, त्यामुळे अनेक शॅक परवान्यांना मुदतवाढ दिलीही जाऊ शकते, असे वाटत होते. पण तसे झाले नाही.

- क्रूझ कार्दोझ,अध्यक्ष-दक्षिण गोवा शॅक मालक संघटना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com