Goa Monsoon Update: राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम

ताळगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या कामराभाट परिसराला मुसळधार (Goa Monsoon Update) पावसाच्या पाण्याने वेढा घातला आहे. लोकांच्या घरा-दारात पाणी घुसले आहे.
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा राज्यात पावसाचा (Goa Monsoon Update) जोर काहीसा कमी झाला असला तरीही आज पश्‍चिम बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 23 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज गोवा वेधशाळेने व्यक्त केला. राज्यात या मान्सून हंगामातला सर्वाधिक म्हणजे 132.1मि.मी पाऊस 19 जुलैला नोंद झाला. राज्यात 12 जुलैपासून मान्सून सक्रिय झाला आहे. 12 जुलै रोजी 130.3 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. आतापर्यंत राज्यात 1901.2मि. मी पाऊस पडला. (Goa Monsoon Update: Heavy rains expected in Goa for two more days)

दरम्यान, गेल्या 24 तासांत म्हापसा येथे 46 मि.मी., पेडण्यात 46.6, फोंडा येथे 49.8, पणजीत 61.7, ओल्ड गोवा येथे 52, साखळीत 31.5, काणकोणात 20.2, दाबोळी येथे 32, मडगावात 32, मुरगाव 40.6, केपे येथे 22 तर सांगेत 35.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Goa Monsoon Update
Goa Weather: वरुणराजाचा कहर, डिचोलीत मुसळधार; VIDEO

ताळगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या कामराभाट परिसराला मुसळधार पावसाच्या पाण्याने वेढा घातला आहे. लोकांच्या घरा-दारात पाणी घुसले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून येथील लोक अनेक दिव्य सहन करत दिवस काढत आहेत. दारात पाणी साचल्याने लहान मुले घाण पाण्यातच खेळत आहेत. पाणी साचल्याने झोपडपट्टी केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. खुद्द येथे असलेल्या महापालिकेच्या कामगारांच्या निवासी इमारतीसमोरही पाणी साचले असून, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. परिसरातील पाणी वेळीच हटवले नाही, तर डेंग्यू मलेरियाचे संकट तर येणार नाही ना, अशी भीती येथील नागरिकांना सतावत आहे.

दरम्यान काणकोणात चापोली धरण जलाशय वेगाने भरत आहे. काणकोणात काल चोवीस तासांत 2 इंच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत काणकोणात 85.59 इंच पाऊस पडला आहे.

Goa Monsoon Update
Goa Monsoon Update: शिवोली-कळंगुटात पावसाचा कहर

काणकोणची तहान भागवणाऱ्या चापोली धरणाच्या जलाशयात 38.06 आरएल पाणीसाठा म्हणजे 1054.८867 हेक्टोमीटर पाणीसाठा तयार झाला आहे. चापोली धरणाजवळ जलस्त्रोत खात्यातर्फे पावसाचे पर्जन्यमापकाच्या साह्याने पावसाची मोजदाद केली जाते, असे जलस्त्रोत खात्याच्या कनिष्ठ अभियंता कल्पना गावकर यांनी सांगितले.

अस्नोडा पार नदीवरील पुलाचा रस्ता खिळखिळा

अस्नोडा पार नदीच्या पुलावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे खिळखिळा झाला आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात या ठिकाणी लहान-मोठे अपघात घडत आहेत. शिवाय वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे पुलावरील रस्त्याला खड्डे पडलेले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्पुरती डागडुजी करून खड्डे बुजवले होते. जोरदार पावसामुळे पुन्हा खड्डे पडले असून, हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी या ठिकाणाहून जाताना जिकीरीचे बनले आहे. पुलावरील पदपथही नादुरूस्त बनलेले असल्यामुळे पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी वाहनचालक व नागरिकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com