Goa Monsoon Update: शिवोली-कळंगुटात पावसाचा कहर

पावसाचे पाणी (Heavy Rain) अजून दोन दिवस शेतात असेच साचून राहिल्यास पीकांची नासाडी होण्याची भीती.
रविवारी दिवसभर पडलेल्या जोरदार पावसामुळे कळंगुट आगरवाड्यातील शेतजमींंना प्राप्त झालेले नद्यांचे स्वरूप
रविवारी दिवसभर पडलेल्या जोरदार पावसामुळे कळंगुट आगरवाड्यातील शेतजमींंना प्राप्त झालेले नद्यांचे स्वरूपसंतोष गोवेकर

शिवोली: शनिवारपासून सततधार पडणाऱ्या धुवांधार पावसामुळे (Heavy Rain) शिवोली (Siolim) तसेच कळंगुट (Calangute) मतदार संघातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहावयास मिळाले. दरम्यान, रविवारी राज्यात रेड अलर्ट (Red Alert in Goa) जारी केल्यामुळे बहुतेक लोकांनी दिवसभर घराबाहेर पडणे टाळले होते परंतु बाजारहाट करण्यासाठी बाजार परिसरात गेलेल्या पुरुष मंडळींवर गुडघाभर पाण्यातून दुचाकी तसेच चारचाक्या हाकण्याची पाळी आल्याचे दिसून आले. (Due to heavy rains in Siolim-Calangute the fields were flooded)

शिवोलीतील मधलेंभाट, इग्रजवाडा -मार्ना ,  फोर्नावाडो , मार्ना बाजार तसेच राय - गुडे आदी परिसरात दिवसभर पडणार्या पावसामुळे नजीकच्या शेतजमीनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने शेतजमीनींना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते दरम्यान, पावसाचे पाणी अजून दोन दिवस शेतात असेच साचून राहिल्यास पीकांची नासाडी होण्याची भीती स्थानिक शेतकऱ्यांनी दै. गोमंतकशी बोलतांना व्यक्त केली.

कळंगुटातील सावंतावाडा, आगरवाडा तसेच प्रभुवाडा येथील शेतजमीनीत पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने याभागातील शेकडों एकर जमीनीतील नवीन पीकांचे पाण्यात कुजून नुकसान झाल्याची माहिती याभागातील शेतकरी  राजेंद्र कोरगांवकर व इतरांनी दिली.

रविवारी दिवसभर पडलेल्या जोरदार पावसामुळे कळंगुट आगरवाड्यातील शेतजमींंना प्राप्त झालेले नद्यांचे स्वरूप
Goa: कोळशाचे आगार करण्याऐवजी 'मुरगाव बंदर' पर्यटन केंद्र बनवा- सरदेसाई

दरम्यान, याभागातील सिकेरी पासून ते कांदोळी आणी कळंगुट-बागा येथील किनारी भागात चार ते पाच मिटर  उंचीच्या लाटा  उसळत होत्या त्यामुळे स्थानिक मच्छीमार बांधवांनी स्थानिक मासेमारीसाठी छोट्या आकाराचे पनेळ तसेच होड्या पाण्यात  उतरवण्याचे धाडस गेले दोन दिवस केले नव्हते त्यामुळे त्याचा परिणाम मासे खवय्यांवर झाल्याचे दिसून आले. दरम्यान, पावसाचा कहर जरी जारी असला तरी परिसरात झाडांची पडझड झाल्याच्या बातम्या रविवारी संध्याकाळ पर्यत कानावर आल्या नव्हत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com