Weather Update: धारबांदोडा, वाळपई, सांगेत पावसाची नव्‍वदी पार; सरासरीतील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांपेक्षा अधिकच

Goa Monsoon Rainfall Deficit: १ जून ते १६ ऑगस्‍ट या मान्‍सून हंगामात राज्‍यात सरासरी ९५.५८ इंच इतका पाऊस पडतो. यंदा मात्र या काळात केवळ ६६.०४ इंच इतक्‍याच पावसाची नोंद झाली आहे.
Goa Monsoon Rainfall Deficit
Weather UpdateDainik Goamatak
Published on
Updated on

पणजी: धारबांदोडा, वाळपई आणि सांगे या केंद्रांवर मान्‍सूनच्‍या पावसाने आतापर्यंत इंचाची नव्‍वदी पार केली असली, तरीही यंदाच्‍या पावसातील सरासरीतील तूट अजूनही ३० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे. १ जून ते १६ ऑगस्‍ट या मान्‍सून हंगामात राज्‍यात सरासरी ९५.५८ इंच इतका पाऊस पडतो. यंदा मात्र या काळात केवळ ६६.०४ इंच इतक्‍याच पावसाची नोंद झाली आहे. राज्‍य हवामान विभागाने २२ ऑगस्‍टपर्यंत पाऊस न पडण्‍याचा अंदाज वर्तवला होता. पण, रविवारी सायंकाळी पणजीसह विविध भागांत पावसाचा शिडकावा झाला.

राज्‍यातील चौदापैकी अकरा केंद्रांवर पावसाने इंचाचे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्‍यात धारबांदोडा, वाळपई आणि सांगे येथे नव्‍वदी पार करीत पावसाने इंचाच्‍या शंभरीकडे वाटचाल सुरू केली आहे.

परंतु, पणजी, दाबोळी आणि मुरगाव या तीन केंद्रांत मात्र अद्यापही पावसाने इंचाचे अर्धशतक पूर्ण केलेले नसल्‍याचे हवामान खात्‍याच्‍या आकडेवारीतून दिसून येते. त्‍यात गतवर्षी १ जून १७ ऑगस्‍ट या कालावधीत तब्‍बल ८७.७७ इंच पावसाची नोंद झालेली होती. त्‍या तुलनेत यंदा मात्र आतापर्यंत सुमारे २२ इंच कमी पाऊस पडल्‍याचेही आकडेवारी सांगते.

Goa Monsoon Rainfall Deficit
Goa Tourism: पर्यटकांची गोव्‍यालाच पसंती! जानेवारी ते जुलैदरम्यान तब्बल 61 लाखांहून अधिक पर्यटकांची भेट

दरम्‍यान, गेल्‍या काही दिवसांत राज्‍यातील धरण क्षेत्रांमध्‍ये पावसाच्‍या प्रमाणात सातत्‍य राहिल्‍याने धरणांतील पाणीसाठा समाधानकारक असल्‍याचे तसेच साळावली, पंचवाडी आणि गावणे ही धरणे ओव्‍हरफ्‍लो झाल्‍याचे जलस्रोत खात्‍याने जारी केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

धरणांतील पाणीसाठा (टक्‍क्‍यांत)

धरण पाणीसाठा

साळावली १०४

तिलारी ८८

अंजुणे ९०

चापोली ७०

आमठाणे ९३

पंचवाडी १०१

गावणे १००

Goa Monsoon Rainfall Deficit
Goa Cricket Association: अनधिकृत क्रिकेट स्पर्धांत खेळणे महागात पडणार; 'जीसीए'चा नोंदणीकृत खेळाडूंना कडक इशारा

आतापर्यंतचा पाऊस (इंचांत)

केंद्र पाऊस

म्‍हापसा ५१.१९

पेडणे ५६.३०

पणजी ४२

जुने गोवे ५७.१३

साखळी ६९.१८

वाळपई ९०.७९

फोंडा ६७.१३

धारबांदोडा ९२.३०

काणकोण ७३.४४

दाबोळी ४५.४६

मडगाव ६३.७१

मुरगाव ४३.९२

केपे ८१.६५

सांगे ९०.२४

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com