Monsoon: मान्सूनचे शेवटचे तीन दिवस उरले, पण पावसाची तूट कायम! राज्यात यंदा तब्बल 36.41 इंच कमी पाऊस, अवघ्‍या तीनच केंद्रांवर 'शतक'

Goa monsoon 2026: मान्‍सून हंगाम संपण्‍यास अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र पावसाची तूट कायम आहे.
Goa Monsoon
Goa MonsoonDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: मान्‍सून हंगाम संपण्‍यास अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र पावसाची तूट कायम आहे. यंदाच्‍या हंगामात १ जून ते २७ सप्‍टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा ३१.१ टक्‍के म्‍हणजेच ३६.४१ इंच इतका कमी पाऊस पडला आहे.

गतसाली चौदापैकी सात केंद्रांमध्‍ये शंभर इंचांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. यंदा केवळ तीनच केंद्रांवर पावसाने इंचांचे शतक गाठल्‍याचे हवामान खात्‍याने जारी केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते.

यंदा मान्‍सूनचा पाऊस राज्‍यात ५ जून रोजी दाखल झाला. त्‍यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा अधिक पाऊस पडण्‍याचा अंदाज वर्तवण्‍यात येत होता. परंतु, सुरुवातीचे काही दिवस बरसल्‍यानंतर पावसाने चार महिन्‍यांतील ११९ दिवसांपैकी बहुतांशी दिवस दडीच मारली. त्‍यामुळे सरासरी पावसातील तूट वाढत जाऊन ती जुलैमध्‍ये ३० टक्‍क्‍यांवर पोहोचली. तेव्‍हापासून आतापर्यंत ही तूट कायम राहिल्‍याचे दिसून येते.

Goa Monsoon
Goa Housing Board: गृहनिर्माणकडून साखळी, थिवीत भूखंडांचा ई-लिलाव; निविदा जारी, 19 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सूचना

१ जून ते २७ सप्‍टेंबर या मान्‍सून हंगामात राज्‍यात सरासरी ११७.३३ इंच पाऊस पडतो. यंदा मात्र या कालावधीत ८०.९२ इंच इतक्‍याच पावसाची नोंद झाली आहे. यातून हा पाऊस सरासरीच्‍या ३१.१ टक्‍के म्‍हणजेच ३६.४१ टक्‍क्‍यांनी कमी असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

गतवर्षी मान्‍सून हंगामातील १ जून ते २७ सप्‍टेंबर या काळात एकूण ११९.३२ इंच पाऊस पडला होता. हा पाऊस सरासरीच्‍या दोन टक्‍के अधिक होता. शिवाय या काळात सांगे, धारबांदोडा, वाळपई, केपे, फोंडा, साखळी आणि पेडणे या सात केंद्रांवर पावसाने इंचांचे शतकही पूर्ण केले होते. यंदा मात्र केवळ वाळपई, धारबांदोडा आणि सांगे या तीनच केंद्रांवर पावसाने इंचांची शंभरी पार केली आहे.

धरणांमध्‍ये समाधानकारक जलसाठा

यंदा राज्‍यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला, तरी धरणांतील जलसाठा मात्र समाधानकारक असल्‍याचे जलस्रोत खात्‍याने जारी केलेल्‍या आकडेवारीतून दिसून येते. सद्य:स्‍थितीत साळावलीत १०१ टक्‍के, तिळारीत ९१ टक्‍के, अंजुणेत ९७ टक्‍के, चापोलीत ७४ टक्‍के, आमठाणेत १०० टक्‍के तर पंचवाडी आणि गावणे या दोन धरणांत प्रत्‍येकी ९८ टक्‍के इतका जलसाठा आहे.

Goa Monsoon
Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

आत्तापर्यंतचा पाऊस

(इंचांत)

केंद्र पाऊस

म्‍हापसा ६२.२९

पेडणे ७६.३६

पणजी ५४.५२

जुने गोवे ७१.०३

साखळी ८१.८१

वाळपई १११.६८

फोंडा ७६.९५

धारबांदोडा ११०.५०

काणकोण ८७.३५

दाबोळी ६२.०१

मडगाव ८०.४१

मुरगाव ६०.१२

केपे ९६.२८

सांगे १०३.७३

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com