Amthane Dam: धुव्वादार पाऊस! मात्र ‘आमठाणे’तील जलसाठा ‘जैसे थे’

अद्याप वाढ नाही : साळ बंधाऱ्यातून पाणीपुरवठा तूर्तास केलाय बंद
Amthane Dam
Amthane DamDainik Gomantak
Published on
Updated on

Amthane Dam गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाऊस पडत असला तरी डिचोलीतील आमठाणे धरणातील जलसाठ्यात अद्याप अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. मात्र आता पाऊस सक्रिय झाल्याने हळूहळू धरणातील जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

तसे संकेतही जलस्रोत खात्याकडून मिळाले आहेत. दुसऱ्या बाजूने पाऊस सक्रिय झाल्याने या धरणात साळ बंधाऱ्यातील पाणी सोडणे सध्या बंद करण्यात आले आहे.

Amthane Dam
Goa Monsoon Update: जागोजागी पडझड: नुकसानीच्या घटनांत वाढ

या वर्षीच्या मे महिन्याच्या तुलनेत गेल्या जून महिन्यात धरणातील पाण्याच्या पातळीत जवळपास एक मीटरने घट झाली होती. त्यात अजून वाढ झालेली नाही. सध्या धरणातील जलसाठ्याची पातळी साधारण ४५.५ मीटरच्या आसपास आहे.

गेल्या वर्षी मोसमी पावसाची सुरूवात समाधानकारक झाली होती. त्यामुळे आमठाणे धरणातील जलसाठ्याची पातळीही समाधानकारक होती. गेल्या वर्षी पावसाळ्यात हे धरण दोन वेळा तुडुंब भरले होते. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात धरणातील जलसाठ्यात घट होते.

Amthane Dam
Goa Monsoon Update: कोपार्डेत पावसामुळे चक्क रस्ताच गेला वाहून !

पाणीपुरवठा बंद : आमठाणे धरणातील जलसाठ्यात घट होऊ लागली की तो नियंत्रित ठेवण्यासाठी साळ येथील शापोरा नदीवरील बंधाऱ्यातील पाणी मोठ्या जलवाहिनीद्वारे या धरणात सोडण्यात येते.

यंदाही मे महिन्यापासून साळ बंधाऱ्यातील पाणी या बंधाऱ्यात सोडण्यात येत होते. आता पाऊस सक्रिय झाल्याने धरणात पाणीपुरवठा करणे सध्या बंद करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com