Goa Monsoon Update: कोपार्डेत पावसामुळे चक्क रस्ताच गेला वाहून !

आमदार डॉ. दिव्या राणे यांच्याकडून दखल : तातडीने सुरू केले रस्ता दुरुस्तीचे काम
Road
Road Dainik Gomantak
Published on
Updated on

Road कोपार्डे-सत्तरी येथील नव्याने केलेला रस्ता खचण्याची घटना शनिवार, 1 रोजी घडली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र, यासंबंधीची दखल आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी घेऊन सकाळपासूनच रस्ता खचलेल्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीकाम करण्याचे आदेश देऊन ते काम हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सविस्तर माहिती अशी की, वाळपई-ठाणे दरम्यानच्या कोपार्डे या ठिकाणी गेल्या वीस वर्षांपासून पावसाळ्यात पाणी भरत होते. यामुळे रस्ता पाण्याखाली जात होता. याबाबत ‘दै. गोमन्तक’मध्ये पावसाळ्यात होणाऱ्या समस्येबाबत बातमी केली होती.

Road
एकीकडे कारशेडवर तर दुसरीकडे रस्त्याच्या मधोमध कोसळले झाड; राज्यात अग्निशमन दलाचे जवान ॲक्शन मोडमध्ये

त्यानंतर आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी याची दखल घेऊन प्रस्तावाला मंजुरी मिळवून दिली. त्यामुळे या रस्त्याला उंची देण्यात आली होती.

मात्र, जोरदार पाऊस पडत असल्याने त्या मार्गावरील नव्याने केलेला रस्ता खचला. याची दखल आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी घेऊन रस्ता सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पावसाळ्यानंतर हा रस्ता हाॅटमिक्स करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर यांनी दिली.

Road
Goa Monsoon Update: जागोजागी पडझड: नुकसानीच्या घटनांत वाढ

या मार्गावरील २ मीटर रस्त्यावर हॉटमिक्स डांबरीकरण कलेले आहे ते कच्चे असून पावसाळ्यानंतर रस्ता सुरळीत करण्यात येणार आहे. आता रस्ता हॉटमिक्स केल्यास पावसामुळे परत वाहून जाऊ शकतो, त्यामुळे विचारविनिमय करूनच हे काम करण्यात आलेले आहे.

त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. आता ज्या ठिकाणी रस्ता खचलेला आहे. त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर हा मार्ग सुरळीत होईल.

- डाॅ. दिव्या राणे, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com