Goa Monsoon 2023: कारापुरात फणसाचे झाड कोसळून दोन घरांची पडझड, सत्तरीत कारवर माड पडून लाखोंचे नुकसान

दोन लाखांहून अधिक रुपयांची हानी
Houses collapsed due to falling tree
Houses collapsed due to falling treeDainik Gomantak

Goa Monsoon 2023 जोरदार पावसाच्या तडाख्यात कोठीवाडा-कारापूर येथे दोन घरांवर भलेमोठे फणसाचे झाड कोसळून दोन लाखांहून अधिक रुपयांची हानी झाली. ही घटना आज (मंगळवारी) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत दोन्ही घरांची पडझड झाली. यावेळी विजेचा एक खांब मोडला.

एका दुचाकीसह तुळशी वृंदावनाचीही मोडतोड झाली. झाड कोसळले, तेव्हा दोन्ही घरातील मंडळी झोपेत होती. या घटनेत वित्तहानी वगळता अन्य कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कोसळधार पावसामुळे आज दिवसभर अन्य भागातही झाडांची पडझड झाल्याची माहिती मिळाली आहे.

Houses collapsed due to falling tree
वास्को-मुरगावमध्ये उच्च माध्यमिक शाळांबाबत आमदारांनी उपस्थित केले प्रश्न; मुख्यमंत्री म्हणाले...

कोठीवाडा-कारापूर येथील किशोर नाणशेकर आणि प्रदीप नाणशेकर यांच्या मिळून दोन्ही घरांच्या मधोमध असलेले जुनाट फणसाचे झाड आज पहाटे कोसळले. या घटनेत दोन्ही घरांच्या छपरांची मोडतोड झाली. किशोर नाणशेकर यांच्या घराच्या अंगणात ठेवण्यात आलेल्या मोटारसायकलसह तुळशी वृंदावनची मोडतोड झाली.

संकटातून सुटका

पहाटे मोठा आवाज झाला. नेमके काय झाले, ते सुरवातीला कळले नाही. झाड पडल्याने आम्ही मोठ्या संकटातून वाचलोय. असे लक्ष्मी नाणशेकर हिने सांगितले. घरावर ज्या ठिकाणी पडले, त्या भागात आम्ही झोपत होतो. मात्र काल रात्री दुसरीकडे झोपलो होतो. त्यामुळे संकट टळले, असेही लक्ष्मी नाणशेकर हिने सांगितले.

Houses collapsed due to falling tree
Goa Monsoon 2023: अस्मानी संकट! खरीप शेती पाण्याखाली, बळीराजाची मेहनत निष्फळ

सत्तरीत कारवर माड पडून लाखोंचे नुकसान

सत्तरी तालुक्यात पाऊस व वाऱ्याने थैमान घातले असून पडझडीचे सत्र सुरुच आहे. गेल्या काही दिवसात पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची, वीज वाहिन्या, खांबाची मोडतोड झाली आहे. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित होत आहे.

रात्री धावे येथे माड पडून दोन कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विनोद उसपकर, महादेव उसपकर यांच्या चारचाकीचे नुकसान झाले. आज सकाळी वेळग-सत्तरी येथे घरावर फणसाचे झाड पडून मोठे नुकसान झाले.

Houses collapsed due to falling tree
गोमन्तक, आरजीच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नारायण नगर होंडा-सत्तरी येथे वडाचे झाड रस्त्यावर पडले. धावे-सत्तरी येथे सरकारी प्राथमिक शाळेजळेच्या कुंपणावर व वीज वाहिन्यांवर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले. भिरोंडा-सत्तरी येथे जंगली झाड पडून वीज तारा, खांबाचे नुकसान झाले.

चोर्लाघाट येथे रस्त्यावर जंगली झाड पडून वाहतूक कोंडी झाली. यावेळी वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन अडथळा दूर केला. आज सकाळपासून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

तर सुमारे 3 लाखांची मालमत्ता वाचविण्यास अग्निशमन दलाला यश आले. यावेळी वाळपई अग्निशमन दलाचे जवान ज्ञानेश्वर सावंत, अरविंद देसाई, के. सी. नाईक, दत्ताराम देसाई व इतर जवांनी मदत कार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com