Goa Monsoon 2023: आडपई, कासवाड्यात अद्यापही पडझड सुरूच, सत्तरीत लाखोंची हानी

वस्तवाडा येथे चार घरांवर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले.
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon 2023: संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे फोंडा तालुक्‍यात घरांवर झाडे कोसळण्याच्या प्रकारांमुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. कासवाडा-तळावली येथील प्रवीण नाईक यांच्या घरावर झाड पडून मोठी हानी झाली. काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला.

फोंडा अग्निशामक दलाने झाडे हटवून रस्‍ता मोकळा केला. दरम्यान, काल शनिवारी खांडेपार येथील पुलावरून नदीत उडी घेतलेल्या यासीन शेख या तिस्क-उसगाव येथील युवकाचा अजून थांगपत्ता लागलेला नाही.

जोरदार पावसामुळे फोंडा तालुक्यातील नदी-नाले, ओढे व तलाव पाण्याने भरून वाहन आहेत. ओपा-खांडेपार येथील श्री सप्तकोटेश्‍वर मंदिर अर्धेअधिक पाण्‍याखाली गेले आहे. ओपा जलप्रकल्पाच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली असून मुर्डी व व सोनारबाग भागाला पाण्याची पातळी वाढली तर धोका संभवत आहे. आपत्कालीन व्यवस्था यंत्रणेने या प्रकाराची दखल घेतली असून सोनारबाग, मुर्डी-खांडेपार व इतर भागावर लक्ष केंद्रीत केले आहे.

ढवळीकरांकडून आडपईत पाहणी

दुर्भाट-आडपई-आगापूर पंचायत क्षेत्रात गेले काही दिवस पडझड सुरूच आहे. झाडे घरांवर पडून मोठे नुकसान झाले आहे. काल जिवंत वीजवाहिन्‍यांवर झाड पडल्याने त्‍या तुटून खाली पडल्‍या. त्‍यांच्‍या संपर्कात आल्‍याने दोन बैलांसह एक कुत्रा गतप्राण झाला होता.

वस्तवाडा येथे चार घरांवर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले. आडपईतील या दुर्घटनेची स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दखल घेऊन या भागाची पाहणी केली व आपद्‌ग्रस्तांना आर्थिक साहाय्य केले. ढवळीकर यांच्यासोबत सरपंच चंदन नाईक व ग्रामस्‍थ उपस्थित होते.

Goa Monsoon 2023
समुद्रात पोहण्याचा मोह महागात, गोव्यात सहा वर्षात 118 पर्यटकांचा बुडून मृत्यू

सत्तरी तालुक्यात पाऊस व वादळी वाऱ्यामुळे घरांवर झाडे पडली. त्‍यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. काल शनिवार रात्रीपासून पावसाने जोर धरला. त्‍यामुळे पुराची भीती व्‍यक्त केली जात आहे. आज रविवारी अनेक ठिकाणी घरांची, झाडांची पडझड झाली.

पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील पणसे प्रभागातील रेश्मा सुरेश गावडे यांचे घर पहाटे तीनच्या सुमारास कोसळल्यामुळे भरपावसात त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली. तसेच लाखोंचे नुकसान झाले. ठाणे-डोंगुर्ली ग्रामीण आरोग्य केंद्रातील छतावरील छप्पर उडून गेले. त्यामुळे पावसाचे पाणी आत शिरले. नाणूस येथे घरावर नारळाचे झाड उन्मळून पडल्याने मोठी हानी झाली.

Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023: वळवई, सावईवेरे गावाला पुराची भीती, तर डिचोलीत स्थिती नियंत्रणात

वाळपई-रेडीघाट रस्त्यावर आंब्याचे झाड पडल्‍याने वाहतुकीची कोंडी झाली. कोपार्डे-सत्तरी येथील गोकुळदास सावंत यांच्या घरावर फणसाचे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले तर कोपार्डे रस्त्यावर जंगली झाड पडल्याने वाहतूक ठप्‍प झाली. भिरोंडा, खोडये-सत्तरी येथे जंगली झाड वीजतारांवर व रस्त्यावर पडण्याची घटना घडली.

वाळपई आरोग्य केंद्राजवळ असलेले भले मोठे गुलमोहराचे झाड रस्त्यावर व वीजतारांवर पडून मोठे नुकसान झालेच. शिवाय वाहतुकीची कोंडी झाली. तार-धावे सत्तरी येथे रस्त्यावर फणसाचे झाड पडले. दाबोस, बुद्रुक-करमळी, इंदिरानगर-कोपार्डे, वाळपई पोस्ट कार्याजवळ, कणकिरे-सत्तरी, कुंभारखण येथे झाडे कोसळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com