Goa Monsoon 2023: वळवई, सावईवेरे गावाला पुराची भीती, तर डिचोलीत स्थिती नियंत्रणात

वाघुर्मे भागात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस म्हादई नदीचे पाणी दूरपर्यंत पसरलेले आहे
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon 2023 वळवई-सावईवेरे भागात गेल्‍या पाच-सहा दिवसांपासून सतत पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

तसेच नदी-नाल्यांना पूर आला असून या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वाघुर्मे भागात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूस म्हादई नदीचे पाणी दूरपर्यंत पसरलेले आहे. तर, कावंगाळ भागातही म्हादई नदीच्या पुराचे पाणी शेती आणि बागायतीत घुसले आहे.

त्यामुळे शेती, बागायतींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सावईवेरे येथील श्री अनंत देवस्थानच्या प्राकारात पाणी साचले आहे. वळवई गाव हा म्हादई नदीच्या तीरावर वसल्याने या भागातील नदीच्या पुराचे पाणी बरेच वरपर्यंत पसरलेले आहे. पुराच्या पाण्याला जोर असल्याने फेरी वाहतूक बंद ठेवण्यात आली असून प्रवाशांचे हाल होत आहेत.

सावईवेरेतील ओढा दुथडी भरून वाहत आहे. या ओढ्याचा प्रारंभ वैजारी-केरी येथील मोठ्या तळ्यापासून प्रारंभ होत असून तो अमरखाणे, वेलकास, खेडे, मधलावाडा, कांवगाळ भा गातून मांडवी नदीला मिळतो. त्यामुळे तळ्याच्या पाण्याबरोबरच ओढ्याचे पाणी वाढले आहे.

Goa Monsoon 2023
Goa Monsoon Update 2023: मुसळधार पावसामुळे पडझडीचे सत्र सुरूच! कोठंबीमध्ये गोठ्यावर कोसळले वडाचे झाड
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak

डिचोलीत स्थिती नियंत्रणात

‘कोसळधार’मुळे नदी-नाले तुडुंब भरले असले तरी रविवारी सायंकाळपर्यंत डिचोलीत पूरसदृश्य स्थिती नियंत्रणात आहे. मात्र पावसाचा कहर पाहता सकल भागात भीती कायम आहे.

दरम्यान, आज दिवसभर पडलेल्या पावसामुळे डिचोलीतील विविध भागात मिळून चार ठिकाणी झाडांची पडझड झाली.

मात्र वित्तहानी वगळता अन्य कोणतीच अनुचित घटना घडली नाही, अशी माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून देण्‍यात आली.

गेला आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातल्याने डिचोलीतील नदी तुडुंब भरली असून, ओसंडून वाहत आहे. सकल भागात जलमय स्थिती निर्माण झाली आहे.

शुक्रवारी मध्यरात्री तर नदीचे पाणी बाहेर फुटले होते. मात्र काल पावसाचा जोर किंचित कमी झाल्याने, पूरसदृश्य स्थिती नियंत्रणात आली होती.

कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर पुन्हा वाढला. दिवसभर जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मात्र सायंकाळी पावसाचा जोर ओसरल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

Goa Monsoon 2023
G20 Summit 2023: ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी ‘आयईए’चे प्रयत्न

उगेतील ‘ते’ झाड तोडणार होते, पण...

सांगे मतदारसंघातील उगे ग्रामपंचायत क्षेत्रात देसाईवाडा भागात वादळी पावसामुळे झाडांची पडझड होऊन घरांची मोठी नुकसानी झाली.

नेत्रावळी येथील सावरी प्रभागात आंब्याचे झाड माडावर आणि माड घरावर पडल्याने घराची हानी झाली.

देसाईवाडा, उगे-सांगे येथील संजय देसाई यांच्या घराशेजारी असलेल्या आंब्याचे झाड धोकादायक असल्याची अनेक वेळा लेखी तक्रार सर्व संबंधित यंत्रणांना देऊनही त्‍याकडे दुर्लक्ष करण्‍यात आल्‍याने अखेर नुकसानी झालीच.

सदर झाड तोडले जाणार म्हणून त्‍यावर क्रमांकही घालण्यात आला होता.

पण आर्थिक खर्च अधिक होत असल्यामुळे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली.

मात्र राहत्या घराची हानी झालीच. संजय देसाई, राहुल देसाई, सार्वजनिक मांड आणि अजून दोघांच्या घरांवर झाडे पडली. त्‍यात घरांची पडझड झाल्याने भर पावसाळ्यात मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com