गोव्यात मान्सूनचे आगमन दमदार! साळावलीसह अनेक धरणांतील पाणीपातळी वाढली; वर्षभराची चिंता मिटली?

Dam Water Storage Goa: जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्याच्या पाणीसुरक्षेसाठी ही एक दिलासादायक बातमी समोर आली आहे
Goa dam updates
Goa dam updatesDainik Gomantak
Published on
Updated on

Water level Rise Goa: गोव्यात नैऋत्य मान्सूनचे लवकर आगमन झालेय आणि राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक जलाशयांमधील पाण्याची पातळीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्याच्या पाणीसुरक्षेसाठी ही एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल, विशेषतः दक्षिण गोव्यासाठी तर ही खुशखबर म्हणावी लागेल.

साळावली धरण भरले, दक्षिण गोव्याला दिलासा

दक्षिण गोव्यात मडगाव, वास्को, केपे आणि सांगे यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे, पाणीपुरवठ्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या साळावली धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत जे धरण केवळ ३७ टक्के भरले होते, ते आता ५४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

जलसंपदा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबद्दल समाधान व्यक्त करत म्हटले की, "पावसाचा हाच जोर कायम राहिल्यास, साळावली धरण लवकरच ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. दक्षिण गोव्याच्या पाणीसुरक्षेसाठी ही एक अतिशय उत्साहवर्धक बाब आहे." साळावली धरणाप्रमाणेच, इतर काही छोट्या धरणांनीही पाणीसाठ्यात चांगली वाढ नोंदवली आहे.

काही धरणांची चिंता कायम

सर्वच जलाशयांना मान्सूनचा समान फायदा झालेला नाही. अंजुणा धरण सत्तरी आणि डिचोलीच्या काही भागांना पाणी पुरवते. या धरणाची पातळी मे महिन्याच्या मध्यातील २१ टक्क्यांवरून घसरून केवळ १० टक्क्यांवर आली आहे, जी चिंतेची बाब आहे.

Goa dam updates
Goa Rain: पावसाचे थैमान! देवस्थानची कमान कारवर कोसळली, चिंचेचे झाड उन्मळले; जनजीवन विस्कळीत

त्याचप्रमाणे बार्देश, पेडणे आणि आसपासच्या भागांसाठी महत्त्वाचे असलेले आमठाणे धरण देखील ४९ टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

याबद्दल स्पष्टीकरण देताना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, "मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अशा प्रकारची तफावत दिसली म्हणून चिंतेचं कारण नाही. काही पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस इतरांपेक्षा उशिरा येतो. पण, भारतीय हवामान विभागाने जोरदार मान्सूनचा अंदाज वर्तवल्यामुळे, येत्या काही आठवड्यांत या धरणांमध्येही पाणीपातळी वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे."

उत्तर गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागांना पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी पाणी पुरवणारे तिळारी जलाशय मे महिन्याच्या मध्यापासून २५ टक्के क्षमतेवर स्थिर आहे. मान्सून आणखी मजबूत झाल्यानंतर सध्या पाणीपातळी कमी असलेल्या धरणांमध्येही लवकरच पाणीसाठा वाढेल, ज्यामुळे संपूर्ण हंगामात राज्याला पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित होईल अशी शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com