Goa Monsoon 2023: गोव्यात 6 जुलै रोजी शाळांना सुट्टी; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सुट्टी; गोवा विद्यापीठाचाही निर्णय
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Monsoon 2023: गोव्यात भारतीय हवामान विभागाने आज, बुधवारी रेड अलर्ट दिला होता. उद्या, गुरूवारी देखील राज्यात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. त्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने उद्या, गुरूवारी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे.

सर्व शिक्षण संस्थांना शिक्षण खात्याने सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी ही माहिती दिली. ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये परीक्षा सुरू आहेत, तेवढेच वर्ग सुरू राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे. परीक्षा असलेल्या ठिकाणी सुट्टी नाही, असे सरकारने संध्याकाळी उशिरा जाहीर केले आहे.

दरम्यान, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही 6 जुलै रोजी सुट्टी असेल, अशी माहिती, शिक्षण संचालक शैलेश झगडे यांनी दिली आहे.

Goa Monsoon 2023
Dupatta Killer Mahanand Naik: दुपट्टा किलर महानंद नाईक पुन्हा कोलवाळ तुरूंगात

दरम्यान, गोवा विद्यापीठाने देखील याबाबत सर्क्युलर काढून विद्यापीठ कॅम्पसमधील सर्व विभागांना उद्या, 6 जुलै रोजी सुट्टी असेल, असे कळवले आहे. आधीच या दिवशी परीक्षांचे नियोजन ठरले असेल तर त्या परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसार होतील, असेही त्यात म्हटले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारप्रमाणे गुरूवारीही राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. बुधवारी उत्तर आणि दक्षिण गोव्यात 50 किलोमीटर वेगाने वारे वाहिले. बुधवारी हवामान विभागातर्फे रेड अलर्ट जारी केला होता.

त्याचप्रमाणे, उद्या (6 जुलै) उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही भागात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेतर्फे वर्तवण्यात आला आहे. 7, 8 आणि 9 जुलै रोजीही राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसेल, अशी माहिती IMD ने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

DA Hike January 2027
Vaibhavi IIT success story
Goa 97 Voters Electoral Roll
Banks Closed for Five Days
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com