Goa Monsoon 2023: कडशीचा प्रवाह कमी, तरी धोका कायम !

१० कुटुंबांचा संपर्क तुटला : वीज, फोनसेवाही ठप्प; जीव कासावीस
Goan Monsoon 2023
Goan Monsoon 2023Dainik Gomantak

Goa Monsoon 2023: जोरदार पडत असलेल्या पावसामुळे मागच्या सोमवार पासून कडशी मोपा नदीला उधाण आल्यानंतर आज थोड्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह पातळी कमी झाली असली तरी मात्र धोका कायम असल्याचे चित्र त्या भागात आहे.

या भागातील दहा कुटुंबांचा संपर्क तुटलेला आहे, त्यापैकी एका कुटुंबाशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न पेडणे तालुक्यातील काही पत्रकारांनी प्रवाहातून वाट काढत घटनास्थळी पोहचून केला.

कडशी नदी वजा ओहोळाचा प्रवाह वाढल्याने त्यावरील पद पूल पूर्ण पाण्याखाली गेला.परिणामी पलीकडे राहणाऱ्या १० कुटुंबांचा संपर्क तुटला आहे. गेल्या आठवड्यात यासंबंधी वृत्त आणि प्रसार माध्यमातून माहिती प्रसारित झाल्यानंतर सरकारी यंत्रणेने मदत कार्य सुरू केले.

आपद्‍ग्रस्त कुटुंबांपैकी पत्रकार उमेश गाड यांनी सांगितले, की आठ दिवसांपासून या नदीला पूर आला होता, कित्येक दिवस या भागातून पलीकडे जाता येत नव्हते. विजेचा लपंडाव, टेलिफोन सेवाही बंद होती.

Goan Monsoon 2023
Goa Assembly : ..आणि मंत्री रवी नाईक यांच्यावर हशा पिकला | Ravi Naik | Vijai Sardesai | #cm

अशा स्थितीत काही पत्रकाराने पहाटे येऊन आमची चौकशी केली. येथील समस्यां संदर्भात वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध झाले त्यानंतर आणि सरकारी यंत्रणेने आमच्याशी संपर्क साधून आम्हाला काय मदत हवी, कशा प्रकारची समस्या उद्भवलेली आहे, याची पाहणी केली, चौकशी केली. त्याबद्दल आपण सरकारी यंत्रणेचे आभार मानत असल्याचे गाड यांनी सांगितले.

धोका पत्करून पत्रकारांनी पार केला पूल !

कडशी मोपा नदी स्थिती जाणण्यासाठी पेडणे तालुक्यातील पत्रकार निवृत्ती शिरोडकर, महादेव गवंडी, मकबूल माळगीमनी आणि नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर घटनास्थळी गेले होते.

त्यात निवृत्ती शिरोडकर आणि मकबूल यांनी धोका पत्करून पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा अंदाज येत नव्हता.

Goan Monsoon 2023
Goa Pro League: पॅक्स ऑफ नागोवा, जीनो, ‘दत्तराज साळगावकर’ संघाला थेट प्रवेश

त्यात पत्रकार मकबूल पाय घसरून पाण्यात पडले,त्याच वेळी निवृत्ती शिरोडकर सोबत असल्याने प्रसंग ओळखून त्याला पकडले,अन्यथा दुर्घटना घडली असती.

मुलांचे शैक्षणिक नुकसान

आपली मुलं जी पेडणे या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये जातात. त्यांना मात्र गेल्या आठ दिवसांपासून शाळेत जाता आलेले नाही. त्यामुळे थोड्या प्रमाणात शिक्षण शैक्षणिक नुकसान होणार असल्याचे गाड म्हणाले.

विद्यार्थिनी मेघना गाड यांनी सांगितले, की आठ दिवस कॉलेजमध्ये जाता आले नाही. त्यामुळे वर्ग आणि प्रात्यक्षिक वर्ग चुकलेले आहेत. काही विद्यार्थी मित्र व्हॉट्सअप द्वारे अभ्यास पाठवतात परंतु प्रत्यक्ष वर्गाला उपस्थित राहता येत नसल्याने तिने खंत व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com