Goa Monsoon 2023: गोवा, कोकणात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; महाराष्ट्रात अलर्ट

मागील काही दिवसांपासून गोवा आणि कोकण पट्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे.
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak

Goa Monsoon 2023: गोव्यात एक आठवड्यापासून दोन्ही जिल्ह्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गोवा आणि कोकण पट्यात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

गोवा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बुधवार आणि गुरुवार कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र यासह देशातील विविध भागात विशेषत: किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अंदमान आणि निकोबार बेटे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ईशान्य भारतात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Goa Monsoon 2023
AAP Goa: लोकसभा निवडणुकीपूर्वी आपची गोव्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, 27 सदस्यांची यादी जाहीर

गोवा, कोकणात दमदार

मागील काही दिवसांपासून गोवा आणि कोकण पट्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात सततच्या पावसामुळे किरकोळ घटना समोर आल्या आहेत. काही ठिकाणी पाणी साचण्यासह, कुठे झाडं उन्मळून कोसळ्याच्या घटना घडल्या आहेत.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट

भारतीय हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला असून, मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आहे. तसेच, बीड, परभणी, सोलापूर, जालना, हिंगोली, अहमदनगर, औरंगाबाद, सातारा, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com