MLA Disqualification Petition: कामत, लोबो यांच्या आमदारकी अपात्रतेबाबतच्या याचिकेवर सुनावणी आता ऑगस्टमध्ये

काँग्रेस नेते अमित पाटकर यांनी दाखल केली होती याचिका
MLA Michael Lobo & Digambar Kamat
MLA Michael Lobo & Digambar KamatDainik Gomantak

Goa Assembly MLA Disqualification Petition: गोवा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी करणारी याचिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विधानसभा सभापतींसमोर दाखल केली होती.

या याचिकेवर आज, सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीवेळी उपस्थित राहण्यासाबाबतची नोटीस आमदार मायकल लोबो, आमदार दिगंबर कामत तसेच अमित पाटकर यांना विधानसभा सचिवालयाने पाठवली होती.

MLA Michael Lobo & Digambar Kamat
सोशल मीडियावर प्रसिध्दी सोडून कुडतरीच्या आमदाराने 25 वर्षांत काय काम केले? भाजप नेत्याचा सवाल

दरम्यान, आजच्या सुनावणीत आमदार कामत आणि आमदार लोबो यांच्या वकीलांनी त्यांचे म्हणणे सभापतींसमोर मांडले. दोन्ही वकीलांच्या मतांना काँग्रेसच्या वकीलांकडून आक्षेप घेण्यात आला.

दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ऑगस्टमध्ये ठेवली आहे. 17 ऑगस्ट रोजी ही सुनावणी होईल.

दरम्यान, पाटकर (Amit Patkar) हे सभागृहाचे सदस्य किंवा आमदार नसल्यामुळे ते अपात्रता याचिका दाखल करू शकत नाहीत, असा दावा लोबो, कामत करत ही याचिका फेटाळावी, अशी मागणी कामत आणि लोबो यांनी सभापतींकडे केली होती.

पण, या सभापतींनी पाटकर यांना याचिका दाखल करण्याचा अधिकार असल्याचे सांगत, याचिका स्विकारली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com