MLA Disqualification Petition: सुनावणीला विलंब होण्याच्या शक्यतेने कामत, लोबोंचे अर्ज सभापतींनी फेटाळले

MLA Disqualification Petition: लोबो व कामत यांनी केलेल्या अर्जाला याचिकादार अमित पाटकर यांच्या वकिलांनी बाजू मांडताना त्याला जोरदार विरोध केला होता.
MLA Disqualification Petition
MLA Disqualification PetitionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

MLA Disqualification Petition: आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीवेळी साक्षीदार व दस्तावेज सादर करण्यासाठी आमदार दिगंबर कामत व आमदार मायकल लोबो यांनी केलेला अर्ज आज सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळला.

याचिकादाराने तोंडी पुरावे सादर केलेले नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी केलेली विनंती मान्य केल्यास उलटतपासणीमुळे सुनावणीला आणखी विलंब होऊ शकतो, असे निरीक्षण आदेशात सभापतींनी नोंदविले आहे.

लोबो व कामत यांनी केलेल्या अर्जाला याचिकादार अमित पाटकर यांच्या वकिलांनी बाजू मांडताना त्याला जोरदार विरोध केला होता. सुनावणी प्रलंबित ठेवण्याची ही चाल आहे.

याचिकेवरील सुनावणी जलदगतीने घ्यायला हवी. सभापतींतर्फे उच्च न्यायालयात लवकरात लवकर सुनावणी पूर्ण केली जाईल असे सांगण्यात आले आहे असा युक्तिवाद केला होता.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार दिगंबर कामत व आमदार मायकल लोबो यांच्याविरुद्ध आमदार अपात्रता याचिका सभापतींसमोर सादर केली होती.

MLA Disqualification Petition
Goa Illegal Liquor Seized: बनावट मद्य प्रकरण: गुजरात पोलिस गोव्यात दाखल

त्यावरील सुनावणी सध्या प्रलंबित आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी साक्षीदार व दस्तावेज सादर करण्यासाठी संमती देण्याची विनंती कामत व लोबो यांनी अर्जाद्वारे केली होती.

भारतीय घटनेच्या १० व्या परिशिष्टानुसार आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी ही याचिकेत सादर केलेल्या दस्तावेजावर अवलंबून असते.

ही सुनावणी ‘समरी प्रोसेडिंग’ असते. त्यासाठी अशा प्रकारच्या सुनावणीची गरज नाही, अशी बाजू पाटकर यांच्या वकिलांनी आज झालेल्या सुनावणीवेळी सभापतींसमोर मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com