Goa Illegal Liquor Seized: बनावट मद्य प्रकरण: गुजरात पोलिस गोव्यात दाखल

Goa Illegal Liquor Seized: राजस्थानलाही पथक रवाना : मुख्य सूत्रधार सुरेश बिष्णोई बेपत्ता
Illegal Liquor Seized
Illegal Liquor SeizedDainik Gomantak

Goa Illegal Liquor Seized: गुजरातमधील नवसारी येथे पकडलेल्या बनावट मद्य प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुरेश बिष्णोई याला पकडण्यावर गुजरात पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने भर दिला आहे.

बिष्णोईला ताब्यात घेण्यासाठी राजस्थानला एक पथक रवाना केले असले, तरी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तो बेपत्ता झाल्याची माहिती गुजरात पोलिसांना मिळाली आहे.

या तपासासाठी गुजरात पोलिस गोव्यात आले असले तरी त्यांनी याबाबत अबकारी खात्याशी अधिकृतपणे संपर्क साधलेला नाही.

मनीष मिश्रा याच्या कारखान्यात तयार झालेले मद्य याआधीही अनेकवेळा गुजरातेत बेकायदेशीरपणे पाठवले गेल्याचा पोलिसांना संशय आहे.

या कारखान्यात उत्पादित झालेल्या मद्याला अबकारी निरीक्षकाने कसे प्रमाणपत्र दिले, हाही तपासाचा रोख आहे. तरीही बिष्णोईला ताब्यात घेतल्यानंतरच कंपनीवर लक्ष केंद्रित करण्याचे गुजरात पोलिसांनी ठरवल्याची माहिती मिळाली आहे.

याआधी त्यांनी अबकारी निरीक्षक आणि कारखाना यावर तपासकाम केंद्रित करण्याचे ठरविले होते.

मात्र, पकडलेला ट्रकचालक फारुक मोयला याने बिष्णोईच्या सांगण्यावरून गोव्यातून गुजरातेत मद्य नेल्याची कबुली काल दिल्यानंतर बिष्णोई तपासकाम करणाऱ्या यंत्रणेच्या रडारवर आला आहे.

Illegal Liquor Seized
Arvind Kejriwal Arrest: दिल्लीत घोटाळा, गोव्यात शिमगा

गुजरातेत पकडलेले मद्य हे गोव्यातून आणले गेले होते हे तपासात उघड झाल्यानंतर या प्रकरणी मद्य विक्रीची दुकाने चालवणारा फ्रान्सिस डिसोझा आणि मद्य उत्पादन करणारा मनीष मिश्रा यांना गुजरात पोलिसांनी गोव्यात येऊन पकडले आहे.

त्यानंतर गोव्यातच या प्रकरणाचे आणखी काही धागेदोरे सापडतात का, याची चौकशी त्यांनी सुरू केली आहे.

‘ते’ मद्य कुठे पोचवले?

ताब्यात घेतलेल्या ट्रकचालकाने सांगितले, की त्याने रामपूर-जोडका येथे मद्य पोचवले आहे. या ट्रकला मार्ग दाखविण्यासाठी एक वाहन ट्रकसमोर चालवण्यात येत होते.

त्या वाहनाचा चालक विक्रम भील याला ताब्यात घेऊन मद्य नेमके कुठे पोचवले, याची खातरजमा गुजरात पोलिसांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com