Seva Pakhwada 2025 | PM Modi Birthday
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

Seva Pakhwada: मंत्री रमेश तवडकर नाराज? राज्यस्तर 'सेवा पखवाडा' कार्यक्रमाला मारली दांडी

Seva Pakhwada 2025: कला अकादमीत झालेल्या कार्यक्रमाला सरकारातील मंत्री, आमदार उपस्थित होते; परंतु मंत्री तवडकरांची अनुपस्थिती प्रकषनि जाणवली.
Published on

पणजी: सेवा पखवाडा उपक्रमाअंतर्गत गोव्यासह देशभर आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'व्हर्चुअल' पद्धतीने संबोधित केले. त्यावेळी त्यांनी देशभरातील महिला आणि आदिवासी समाजातील नागरिकांसाठी विविध योजनाही घोषित केल्या.

कला अकादमीत झालेल्या कार्यक्रमाला सरकारातील मंत्री, आमदार उपस्थित होते; परंतु मंत्री तवडकरांची अनुपस्थिती प्रकषनि जाणवली. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून देशभर सेवा पखवाडा साजरा होत आहे.

कला अकादमीतील कार्यक्रमात मंत्री तवडकर उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, ते कामात व्यस्त असल्याने आले नाहीत की नाराज असल्याने आले नाहीत, अशी चर्चा सुरू होती.

Seva Pakhwada 2025 | PM Modi Birthday
...त्यांनी मला रडवलं, ओझं घेऊन भर पावसात 5KM चालले; दक्षिण गोव्यात टॅक्सी माफियांची गुंडागर्दी, गुजराती महिलेने सांगितला धक्कादायक अनुभव Video

याबाबत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना विचारले असता 'तवडकर काणकोणमधील सेवा पखवाडा कार्यक्रमात व्यस्त राहिले. त्यामुळे ते पणजीत उपस्थित राहिले नाहीत', असे त्यांनी सांगितले.

गोव्यासह देशभरातील महिलांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार' योजनेचा राज्यभरातील महिलांनी लाभ घ्यावा आणि आपल्या जवळच्या प्राथमिक, सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन शारीरिक तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

Seva Pakhwada 2025 | PM Modi Birthday
Akasa Air चा सावळा गोंधळ, पुण्यात सुरक्षा तपासणी विलंबामुळे सहाजण गोव्यातील शूटिंग चॅम्पियनशिपला मुकले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी कला अकाद‌मीत आयोजित राज्यस्तरीय सेवा पखवाडा कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कला अकादमीतील सेवा पखवडा कार्यक्रमाला मुख्यमंत्री सावंत यांच्यासह मंत्री बाबूश मोन्सेरात, रोहन खंवटे, सुभाष फळदेसाई, सुदिन ढवळीकर, सुभाष शिरोडकर, नीळकंठ हळर्णकर यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे व इतर आमदार उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com