बंदी असूनही पैरामध्ये खनिज वाहतूक

चौगुले खाण कंपनीच्या परिसरातच खनिज वाहतूक सुरु
Goa mining
Goa miningDainik Gomantak

डिचोली : न्यायालयाची अंतरिम बंदी असतानाही पैरा भागात खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांचा पुन्हा एकदा धडधडाट सुरू झाला आहे. शिरगावहून पैरापर्यंत खनिज वाहतूक सुरू असून, बंदी असतानाही खनिज वाहतूक होत असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

गोवा खंडपीठाने अंतरीम बंदी घालण्यापूर्वी मयेतील खनिज वाहतुकीचा विषय बराच तापला होता. अखेर गोवा फॉऊंडेशनच्या मदतीने स्थानिक मुळाक खाजन शेतकरी संघटनेने मयेतून होणाऱ्या बेकायदेशीर खनिज वाहतुकीच्या मुद्द्यावरून न्यायालयात धाव घेतली होती. 16 जून रोजी पुढील सुनावणी होईपर्यंत मयेतून खनिज वाहतुकीस अंतरीम बंदी घालणारा आदेश 4 मे रोजी न्यायालयाने दिल्यानंतर गेला महिनाभर खाण परिसरात सामसूम पसरली होती. मात्र, आता मये गावातून नसली तरी चौगुले खाण कंपनीच्या परिसरातच खनिज वाहतूक सुरू आहे. ही खनिज वाहतूक एका ठेकेदाराकडून करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

Goa mining
पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालकांची सरकार बरोबर चर्चा

खनिज लिज क्षेत्राबाहेर

मिळालेल्या माहितीनुसार, शिरगाव येथील चौगुले खाणीवर पडून असलेला खनिज माल पैरा येथील कंपनीच्याच प्लांटजवळ सुरक्षित ठिकाणी डम्प करण्यात येतोय. 6 जूनपर्यंत लिजक्षेत्रे खाली करण्याचा सरकारचाआदेश आहे.

लिज क्षेत्रे सोडावी लागलीच तर माल खाणीवरच पडून राहिल. मालावर कंपनीचा अधिकार राहणार नाही. त्यामुळेच शिरगाव खाण लिज क्षेत्रातील खनिज लिज क्षेत्राबाहेर हलविण्यात येत आहे अशी माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com