Goa: मायल्सवर हॉटेलातून प्रवासी घेण्यास बंदी घाला; टॅक्सीवाल्यांची मागणी

स्थानिक टॅक्सी चालकांसाठी प्रत्येक हॉटेलात कक्ष स्थापन करून टॅक्सी (Taxi)चालक संघटनेला तो चालवायला द्यावा अशी मागणी केली.
आमदार चर्चिल आलेमाव यांनी टॅक्सी चालक आणि हॉटेल प्रतिनिधी यांची बैठक
आमदार चर्चिल आलेमाव यांनी टॅक्सी चालक आणि हॉटेल प्रतिनिधी यांची बैठकDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गोवा मायल्स (Goa Miles)सेवेमुळे गोव्यात स्थानिक पर्यटक टॅक्सीना प्रवासी मिळत नाहीत. असा दावा डिजिटल मीटर (Digital meter)टॅक्सी चालकांनी केला आहे. आम्ही डिजिटल मीटर बसविण्यास तयार आहोत मात्र गोवा मायल्स सेवा मोडीत काढले पाहिजे, अशी मागणी वार्का येथील पर्यटक टॅक्सी चालकांच्या बैठकीत करण्यात आली.

बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी टॅक्सी चालक आणि हॉटेल प्रतिनिधी यांची बैठक घेतली. यावेळी स्थानिक टॅक्सी चालकांसाठी प्रत्येक हॉटेलात कक्ष स्थापन करून टॅक्सी चालक संघटनेला तो चालवायला द्यावा अशी मागणी यावेळी केली.

आमदार चर्चिल आलेमाव यांनी टॅक्सी चालक आणि हॉटेल प्रतिनिधी यांची बैठक
Goa: मडगाव स्कुल कॉम्पलेक्स सहकारी पतसंस्थेतर्फे वाहन कर्जाची व्यवस्था

गोवा मायल्स ही सेवा शहरात गाड्या चालविण्यासाठी आहे. त्यांना किनारपट्टीत सेवा देण्याचा अधिकार नाही. प्रवाशांना त्यांनी विमानतळावरून (Airport)हॉटेलात आणून सोडल्यास आमची काही हरकत नाही पण हॉटेलातून त्यांना प्रवासी घेता येणार नाही. हा व्यवसाय स्थानिक टॅक्सी चालकांनाच मिळण्याची गरंज आहे असे आलेमाव यांनी सांगितले.

प्रत्येक हॉटेलमध्ये(Hotels) टॅक्सी कक्ष उभारणे आणि तो स्थानिक टॅक्सी संघटनेला चालविण्यास देणे ही कल्पना चांगली आहे. हा प्रस्ताव आम्ही हॉटेल व्यवस्थापच्या समोर ठेऊ. यानंतर व्यवस्थापानाच्या संमती या बाबतीत निर्णय घेतील. असे यावेळी हॉटेल्स व्यवस्थापनांचे प्रतिनिधी हर्षद देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

umakant khot death case morjim
cm pramod sawant on goa fisheries
damu naik warns babu ajgaonkar
Goa Assembly Election 2027
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com