Goa Temple Theft Case: सुशेगातपणा भोवतोय! मंदिरं बनताहेत असुरक्षित; सर्वणमध्ये सुवर्णालंकारांसह लाखोंचा ऐवज लंपास

सर्वणमध्ये 13 महिन्यांनंतर पुन्हा सातेरीचे मंदिर फोडले
Goa Temple Theft Case
Goa Temple Theft CaseDainik Gomantak

Goa Temple Theft Case राज्यात मंदिरांमधील चोऱ्यांचे सत्र काही केल्या थांबेना झाले आहे. सर्वत्र चतुर्थीचा उत्साह संचारला असतानाच सर्वण-डिचोली येथील श्री सातेरी देवीचे मंदिर फोडून सुवर्णालंकारांसह लाखो रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शुक्रवारी (ता.15) रात्री ते शनिवारी पहाटेदरम्यान चोरीचा ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

श्री सातेरी देवीचे मंदिर गावापासून काही अंतरावर निर्जनस्थळी आहे. चोरांनी मंदिराच्या गर्भकुडीच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतील देवीच्या अंगावरील नथ आदी अलंकार लंपास केले.

मंदिराभोवताली असलेल्या देवतांच्या काही घुमट्यांवरील चांदीचे कळस आणि घंटाही चोरल्या. विशेष म्हणजे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेली छायाचित्रे दर्शविणारी स्क्रीनही चोेरांनी उखडून नेली. आज (शनिवारी) सकाळी चोरीचा हा प्रकार पुजाऱ्याच्या लक्षात आला.

देवस्थान समितीने पोलिसांत तक्रार नोेंदवल्यानंतर डिचोली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी हाती लागल्याची माहिती मिळाली आहे.

वर्षानंतर दुसऱ्यांदा चोरी

गेल्या वर्षी पंचायत निवडणुकीच्या धामधुमीत म्हणजेच 11ऑगस्ट 2022 रोजी हे मंदिर चोरांनी फोडले होते. त्यावेळी सुवर्णालंकारांसह दोन लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता.

आता तब्बल 13 महिन्यांनंतर हे मंदिर पुन्हा फोडल्याने गावात खळबळ माजली आहे. चोऱ्यांचे हे दोन्ही प्रकार पाहता, एखाद्या माहीतगाराकडूनच या चोऱ्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Goa Temple Theft Case
Save Mhadei Save Tiger: सरकार गोव्याचे की कर्नाटकचे? 'म्हादई बचाव'चा उद्विग्न सवाल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com