Goa: गोव्यातील SSB MTS कर्मचाऱ्यांना मिळतो 2 महिन्यांनी पगार, 18 जण प्रतीक्षेत; आरोग्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी

Goa Medical College MTS staff salary: सुपर स्पेशालिटी ब्लॉक (एसएसबी) यामधील बहुउद्देशीय सेवक व टेक्‍नीशन कर्मचारी २०१४ पासून कंत्राटी तत्त्वावर असून गेल्या आठ वर्षांपासून ते नियमित पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.
Goa Medical College MTS staff salary issue
Goa Medical College MTS staff salary issueDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सुपर स्पेशालिटी ब्लॉक (एसएसबी), गोवा वैद्यकीय महाविद्यालयामधील बहुउद्देशीय सेवक (एमटीएस) व टेक्‍नीशन कर्मचारी २०१४ पासून कंत्राटी तत्त्वावर काम करत असून गेल्या आठ वर्षांपासून ते नियमित पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

सध्या त्यांना दोन महिन्यांनी पगार दिला जातो, असा दावा या कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना यासंदर्भात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

कर्मचाऱ्यांशी संवाद साधला दर महिन्याला नियमित पगार मिळावा आणि पगारात होणारा उशीर थांबवावा अशी आमची मागणी आहे. २०१४ पासून एसएसबीमध्ये कंत्राटी तत्त्वावर काम करत आहोत.

Goa Medical College MTS staff salary issue
Art Teachers Salary: कला शिक्षकांसाठी मोठी बातमी! वर्षभरानंतर मिळणार वेतन; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

आमच्यानंतर नियुक्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली आहे, तरी आम्हा सुमारे १८ कर्मचाऱ्यांना अजूनही कंत्राटी तत्त्वावरच सेवेत ठेवले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.पगार उशिरा मिळत असल्याने, यामुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण, घरभाडे आदी बाबतीत अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Goa Medical College MTS staff salary issue
Vishwajit Rane: नोकरीसाठी कधीही पैसे घेतले नाहीत! Viral Video वरती राणेंचे स्पष्टीकरण; पोलिसांत तक्रार करण्याचे आवाहन

मंत्र्याकडे अपेक्षा

मंत्री विश्वजित राणे हेच आमचे शेवटचे आशास्थान आहेत. त्यांनी यामध्ये लक्ष घालावे. प्रत्येक महिन्याचा पगार वेळेवर मिळावा आणि सर्व १८ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी. अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com