GMC Recruitment: गोमेकॉत नोकरीची संधी! 39 पदांसाठी कंत्राटी भरती जाहीर; मानधन 28 हजार ते 1.65 लाखांपर्यंत

Goa medical college contractual recruitment 2026: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्‍पितळात (गोमेकॉ) कंत्राटी पद्धतीवर विविध प्रकारची ३९ पदे भरण्‍यासाठी इच्‍छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्‍यात आले आहेत.
Goa medical college contractual recruitment
Goa medical college contractual recruitmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्‍पितळात (गोमेकॉ) कंत्राटी पद्धतीवर विविध प्रकारची ३९ पदे भरण्‍यासाठी इच्‍छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्‍यात आले आहेत. याबाबतची जाहिरात गोमेकॉ प्रशासनाने गुरुवारी प्रसिद्ध केली आहे.

स्‍टाफ परिचारिकांची १४, भूलचिकित्‍सा विभागात साहाय्‍यक प्राध्‍यापकाची ८, ओबीसी विभागासाठी साहाय्‍यक प्राध्‍यापक आणि अस्‍थिरोग विभागासाठी व्‍याख्‍यात्‍यांची प्रत्‍येकी तीन, अस्‍थिरोग विभागासाठी साहाय्‍यक प्राध्‍यापक आणि नेत्रचिकित्‍सा विभागासाठी व्‍याख्‍यात्‍याची प्रत्‍येकी २, तर ओबीसी विभागासाठी सहयोगी प्राध्‍यापक, जनरल शल्‍यचिकित्‍सा विभागासाठी व्‍याख्‍याता, अस्‍थिरोग विभागासाठी साहाय्‍यक प्राध्‍यापक, आपत्‍कालीन वैद्यकीय अधिकारी, फिजिओलॉजी प्रशिक्षक, वरिष्‍ठ तंत्रज्ञ आणि भौतिकोपचारतज्ञ या पदांची प्रत्‍येकी एक जागा कंत्राटी पद्धतीवर भरण्‍यात येणार आहे.

Goa medical college contractual recruitment
Goa Sand Mining: रेती उत्खननासाठी योग्य तोडगा काढा, प्रश्‍‍न पंतप्रधानांच्या दरबारी; 'सीआरझेड' नियमांमुळे उत्खनन ठप्प

दरम्‍यान, या पदांसाठी २८ हजार ते १.६५ लाखांपर्यंत मानधन देण्‍यात येणार असल्‍याचेही जाहिरातीत नमूद करण्‍यात आले आहे.

Goa medical college contractual recruitment
Goa Weather Update: पुढील 4 दिवस राज्यात तुरळक पावसाची शक्यता

येत्‍या ११ जूनला मुलाखती

कंत्राटी पदांसाठी येत्‍या ११ जून रोजी सकाळी दहा वाजता गोमेकॉतील लेक्‍चर हॉलमध्‍ये मुलाखती होणार असून उमेदवारांचे वय ४५ पेक्षा अधिक नसावे, असेही गोमेकॉ प्रशासनाने म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com