
Amarnath Panjikar गोवा राज्य इंडियन डेंटल असोसिएशनच्या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी किनारपट्टी भागात तोतया दंतवैद्य पर्यटकांना लुटत असल्याची कबुली दिली. यावरून आता राजकारण तापले असून काँग्रेसच्या अमरनाथ पणजीकर यांनी भाजप सरकारचा निषेध केला.
गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तोतया दंतवैद्यांवर कारवाई करू शकत नाहीत ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
भाजप सरकारच्या ‘फेक इन इंडिया’ मिशन अंतर्गत गोवा आता ‘क्वॅक डेस्टिनेशन’ म्हणून उदयास येत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस मीडिया सेलचे प्रमूख अमरनाथ पणजीकर यांनी केला.
'आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या आशीर्वादाने गोव्यात तोतया दंतवैद्य आणि क्वॅक्स कार्यरत असल्याचा मला संशय आहे. डॉ. प्रमोद सावंत हे आरोग्यमंत्र्यांना घाबरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत नाही. मुख्यमंत्र्यांनी बनावट डेंटिस्ट आणि क्वॅक्स यांच्यावर कारवाई करून माझा संशय चुकीचा ठरवावा,' असे आव्हान अमरनाथ पणजीकर यांनी दिलेय.
दरम्यान गोव्यात कार्यरत वैद्यकीय व्यावसायिकांची ओळख पटवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांकडे कोणतीही यंत्रणा नसल्याची वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांच्या विधानाने उघड झाली आहे.
वैद्यकीय व्यावसायिकांच्या शैक्षणिक पदव्या आणि नोंदणी प्रमाणपत्रे तपासण्यासाठी अधिकाऱ्यांना कोण अडवते? असा सवाल देखील अमरनाथ पणजीकर यांनी केलाय.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.