गोव्याच्या मार्केटमध्ये कैऱ्या, आंबे दाखल! भाज्यांच्या किंमती वाढल्या; काय आहेत ताजे दर? जाणून घ्या..

Goa Mango Vegetable Price: राज्यातील काही बाजारपेठांमध्ये तुरळक प्रमाणात मानकुराद देखील विक्रीसाठी आलेला आहे परंतु अजून पणजीत स्थानिक आंबा विक्रीसाठी दाखल झालेला नाही.
Goa Mango Vegetable Price
Goa Mango Vegetable PriceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: काजू, फणस आणि आंब्याचा हंगाम जवळ आला आहे. त्याचबरोबर पणजी बाजारात मागील काही दिवसांपासून नीलम आंबा दाखल झाला आहे. प्रती किलो ३०० रुपये दराने त्याची विक्री होत आहे. यासोबतच मागील महिन्यापासून तोतापुरी आंबा देखील दाखल झालेला आहे.

राज्यातील काही बाजारपेठांमध्ये तुरळक प्रमाणात मानकुराद देखील विक्रीसाठी आलेला आहे परंतु अजून पणजीत स्थानिक आंबा विक्रीसाठी दाखल झालेला नाही. आंब्यासोबतच लहान तसेच मध्यम आकाराच्या कैऱ्या विक्रीसाठी आल्या असून गेल्या आठवड्यात शंभर रुपयांना सहा कैऱ्या विकल्या जायच्या, परंतु आता आवक काही प्रमाणात वाढल्याने शंभर रुपयांना ८ कैऱ्या विकल्या जात आहेत.

Goa Mango Vegetable Price
Mankurad Mango: मानकुराद बाजारात आला; पण दर ऐकून हिरमोड झाला! एका डझनासाठी मोजावे लागतायत 'इतके' हजार

बिन्स, भेंडी खातेय भाव

मागील आठवड्याच्या तुलनेत काही भाज्यांच्या दरात वाढ झालेली आहे. परंतु बाजारातील भाज्यांच्या तुलनेत फलोत्पादनावरील दर समाधानकारक आहेत. पणजी बाजारात गेल्या आठवड्यात ८० रुपये किलो दराने भेंडी विकली जायची, परंतु आता ९० रुपये किलो दराने विकली जात आहे. बिन्सच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात बिन्स ८० रुपये प्रती किलो दराने विकली जात होती. काही भाज्यांचे दर स्थिर आहेत. कांदे बटाटे आणि टोमॅटो यांचे दर देखील स्थिर आहेत.

Goa Mango Vegetable Price
Goa Vegetable Rates: दसऱ्यानंतर भाज्यांच्या किंमतीत बदल! रताळी, भुईमुगाच्या शेंगा बाजारात दाखल; जाणून घ्या ताजे दर..

भाज्यांचे दर

बाजारातील दर फलोत्पादनाचे दर

भेंडी - ९० ६०

कोबी - ३० २१

गाजर - ५० ३०

फ्लॉवर - ४० ३०

बिन्स - ८५ ५७

मिरची - १२० ८२

कांदा- ४० २५

बटाटा - ३० ते ४० २३

टोमॅटो - ४० २४

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com