Goa Traffic Police मडगावातील काही नगरसेवक व नागरिकांकडून पोलिस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करीत नाही, अशी टीका झाल्यानंतर वाहतूक पोलिस सक्रिय झाले आहेत.
लगेच आपला इंगा दाखविण्यास सुरवात केली असून शुक्रवारी अनेक ठिकाणी नो पार्किंग झोनमध्ये पार्क केलेल्या वाहनांच्या टायरांना क्लॅम्प लावण्यात आले.
पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे नगरसेवक महेश आमोणकर तसेच वाहतूक पोलिस निरिक्षक गौतम साळुंके यांचे अभिनंदन होत आहे. तसेच ही कारवाई नियमीत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांकडून सूचना
दरम्यान, वाहतूक पोलिसांनी मडगावातील कोणत्या भागातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, याबाबत लोक सूचनाही करू लागले आहेत.
यात आके येथील विशाल मेगा मार्ट समोरील रस्ता, कोलवा मुंगुल रस्ता, रॉयल फूड ते कारो कॉर्नर रस्ता, लॉयला हायस्कूल ते दामोदर कॉलेज रस्ता, पॉपुलर हायस्कूल ते दामोदर विद्याभवन रस्ता, आझाद नगरी-राजेंद्र प्रसाद स्टेडिअम रस्ता यांचा समावेश आहे. काहींनी पे पार्किंग सुरू करण्याची सूचनाही केली आहे.
मडगावातील पार्किंग प्लाझाची फाइल मान्यतेसाठी नगरपालिका प्रशासन खात्याला पाठवण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत निविदा जारी होणार आहेत.
- महेश आमोणकर, नगरसेवक
धारबांदोडा व फोंडा तालुक्यात मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसांत ९ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे नोंद केले आहेत. तसेच जानेवारी ते १६ ऑगस्टपर्यंत एकूण ८२ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे नोंद केले आहेत.
वाहनचालक दारूच्या नशेत वाहने चालवीत असल्याने रस्त्यावर अपघात घडतात. बाणस्तारी येथील अपघातानंतर दारुड्या चालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.