Goa Crime News: गोव्यात महिला क्रीडा अधिकाऱ्याचा छळ!

Goa Crime News: चौकशी सुरू : प्रशिक्षकाला मंत्र्याच्या कार्यालयाचा आसरा
 Crime News | Goa News
Crime News | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Crime News: गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सेवेतील एका बास्केटबॉल प्रशिक्षकाने गेले दशकभर कामाच्या ठिकाणी आपली सतावणूक केल्याचा गंभीर लेखी आरोप प्राधिकरणाच्या एका महिला क्रीडा अधिकाऱ्याने केल्यानंतर चौकशीची चक्रे हळूच फिरत असल्याचे समोर आले असून त्या प्रशिक्षकाने खुद्द क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याच कार्यालयाचा आसरा घेतल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला क्रीडा अधिकाऱ्याने गेल्या 20 जुलै रोजी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकांकडे संबंधित बास्केटबॉल प्रशिक्षकाविरोधात लेखी तक्रार नोंदविली होती.

त्यावेळी हा प्रशिक्षक प्रतिनियुक्तीवर क्रीडामंत्र्यांच्या कार्यालयात रुजू झाला होता. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे माजी कार्यकारी संचालक अजय गावडे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत अंतर्गत चौकशी समितीमार्फत (आयसीसी) या प्रकरणी चौकशी सुरू केली होती.

यासंदर्भात क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते व्यस्त असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता नागवेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, ‘संबंधित प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही होईल.

त्यासंदर्भात हे प्रकरण हाताळणाऱ्या अधिकाऱ्यास निर्देश दिले आहेत. बास्केटबॉल प्रशिक्षकाच्या नियुक्तीबाबतही आपण पडताळणी करणार आहे.’ आपली सतावणूक केल्याची तक्रार केल्यानंतर संबंधित महिला क्रीडा अधिकाऱ्यास न्याय देण्याऐवजी त्यांच्यावरच कारवाई करण्यात आल्याचे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सूत्राने सांगितले.

त्या माहितीनुसार, राज्यात पंचायत निवडणूक आचारसंहिता असताना 1 ऑगस्ट रोजी त्यांची पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात बदली करण्यात आली. त्यांचे पद अधिकारी दर्जाचे असूनही क्रीडा संकुलातील क्रीडापटूंना मार्गदर्शन करण्यास सांगण्यात आले, तसेच कामाची वेळ 45 मिनिटांनी वाढविण्यात आला.

या महिला क्रीडा अधिकाऱ्याच्या कार्यालयीन कामकाजासंदर्भात फाईल्सही प्रलंबित ठेवण्यात आल्याची माहिती आहे. कामाच्या ठिकाणी महिला अधिकाऱ्याच्या सतावणूक तक्रारीची अजय गावडे यांनी दखल घेत चक्रे वेगाने फिरविण्यास सुरवात केली.

त्याअंतर्गत 20 ऑक्टोबर रोजी आदेशान्वये त्यांनी संबंधित बास्केटबॉल प्रशिक्षकाची मिरामार येथील एका शाळेत प्रशिक्षक या नात्याने तीन दिवस, तर दोन दिवस पेडे-म्हापसा येथे प्रशिक्षणासाठी नियुक्ती केली.

 Crime News | Goa News
'The Kashmir Files' ला 'वल्गर आणि प्रोपेगेंडा' म्हणणारे नादव लॅपिड आहेत कोण?

त्यानंतर अजय गावडे यांनाच गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकपदावरून मुक्त करण्यात आले आणि एक नोव्हेंबर रोजी डॉ. गीता नागवेकर यांच्याकडे प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली.

इतर महिला कर्मचाऱ्यांचीही सतावणूक

बास्केटबॉल प्रशिक्षकाने केवळ आपल्यालाच नव्हे, तर कामाच्या ठिकाणी इतर महिला कर्मचाऱ्यांचीही सतावणूक केल्याचे संबंधित महिला क्रीडा अधिकाऱ्याने आपल्या तक्रारीत नोंद केले आहे. एका महिला प्रशिक्षकाने संबंधित प्रशिक्षकाच्या जाचाला कंटाळून नोकरीचाच राजीनामा दिल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Olympians Development
236 Grams Ganja Charas Goa
Goa Olympic Association election
Goa Yoga Day RTI Details
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com