Goa News: मडगाव शहरात सौंदर्यीकरण योजनेला काल आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. गोमन्त विद्या निकेतनची संरक्षक भिंत, कोंब - मडगाव येथील महिला नूतन हायस्कूलजवळ घड्याळ टॉवर व जुन्या भिंतीच्या सुशोभीकरणास प्रारंभ करण्यात आला.
नगरपालिका प्रशासन संचालनालयाची मान्यता घेऊन मडगाव नगरपालिका 17.5 लाख रुपये खर्चून ही सौंदर्यीकरणाची योजना राबवली आहे. यावेळी कामत म्हणाले, की मडगाव नगरपालिकेमागील पार्किंग इमारतीसाठीची निविदा जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
तसेच, ही इमारत कार्यरत झाली की पार्किंग समस्या थोड्या प्रमाणात सुटेल. रावणफोंड येथे 66 कोटी रुपये खर्चून सहापदरी उड्डाणपूल बांधला जाईल. सध्याचा पूल कमकुवत झाला आहे. तेथे नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव पुढे केला आहे.
पदपथाला मिळणार हार्मोनियमचा साज
पदपथाला मिळणार हार्मोनियमचा साजगोमंत विद्या निकेतनच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मोठी गिटारे उभी केली जातील. तसेच संरक्षक भिंतीचे लोखंडी गज स्वर शब्दांनी सजवले जातील. तसेच पदपथाला हार्मोनियमसारखा साज चढविला जाणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.