Goa Accident Cases: धारबांदोडा कुर्टी-मोले रस्ता बनला जीवघेणा!

Goa Accident Cases: गोवा राज्यातील अपघातांची मालिका सुरुच असून विविध महामार्गांवर रोजच अपघात होत आहेत.
Goa Accident Cases
Goa Accident CasesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Cases: राज्यातील अपघातांची मालिका सुरुच असून विविध महामार्गांवर रोजच अपघात होत आहेत. या अपघातांतून बळी जाणाऱ्यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. फोंडा ते उसगाव व धारबांदोडा आणि पुढे मोलेपर्यंतच्या रस्त्यावर तर कायम अपघात होत असून हा रस्ता चौपदरी केला, तरी वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे आणि दारुच्या सेवनामुळेही अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फोंड्यातून बेळगाव, हुबळीला जाण्यासाठी उसगाव - धारबांदोडा - मोले या रस्त्याचा वापर केला जात आहे. या महामार्गावर कायम वाहतूक सुरू असते, त्यातच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या रस्त्यावर बराच ताण असतो.

Goa Accident Cases
Goa Crime News: बलात्कारप्रकरणी गोव्यातील आसिफला 10 वर्षाचा तुरुंगवास!

विशेषतः खांडेपार येथे नवीन पुलाच्या जोडरस्त्याचे काम अडून असल्याने या ठिकाणी बाजारातून जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या कायम भेडसावत असते. त्यामुळे या खांडेपारच्या नवीन पुलाच्या जोडरस्त्याचे काम त्वरित हाती घेण्याची आज खरी गरज निर्माण झाली आहे.

कुर्टी ते उसगाव-मोले रस्ता चांगला

कुर्टी ते उसगाव व पुढे मोलेपर्यंतचा रस्ता अतिशय चांगला आहे. फक्त चौपदरी रस्त्यावरील खांडेपार येथील नवीन पुलाच्या जोडरस्त्याचे काम तेवढे पूर्ण व्हायला हवे. हा रस्ता रुंद झाल्यामुळे वाहतूक सुरळीत होत आहे. पूर्वी उसगाव ते धारबांदोडा व मोलेपर्यंतच्या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी व्हायची, पण आता वाहतूक कोंडीची समस्या मिटली तरी अपघातांचे प्रमाण काही थांबलेले नाही.

Goa Accident Cases
Goa News: 'माध्यान्ह'ची समस्या न सुटल्यास बेमुदत उपोषण

वर्षभरात सहा बळी

उसगाव ते मोलेपर्यंतच्या रस्त्यावर गेल्या वर्षभरात सहा बळी गेले आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांच्या जीवावर बेतण्याचे प्रकार घडले असून भरधाव वाहतूक त्यातच पर्यटकांकडून बेजबाबदार वाहन हाकल्यामुळेही अपघात झाले आहेत. मोलेहून दूधसागर धबधब्यावर जाताना पर्यटकांकडून बऱ्याचदा हुल्लडबाजी करण्यात येते, त्यावर चाप बसायला हवा.

दारूच्या सेवनामुळेही अपघात

रस्ता चांगला असला, तरी दारूच्या सेवनामुळे अपघात होत असतात. त्यातच रस्ता चांगला असला की वाहने सुसाट पळवण्याचे प्रकार होत असल्याने अपघातांना निमंत्रणच मिळत आहे. विशेषतः तिस्क - उसगाव भागातील एमआरएफ भागात रस्त्याच्या कडेला अवजड वाहने पार्क करण्याचे प्रकार होत असल्याने रात्रीच्या वेळेला या वाहनांना धडकून अपघात होण्याचे प्रकार घडले आहेत, त्यात बळीही गेले आहेत.

एमआरएफजवळील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस व वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी त्वरित लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.

Goa Accident Cases
Goa Railway: ऐन दिवाळीत आरक्षित तिकिटांवर दलालांचा डल्ला!

शैलेश शेट (कुर्टी - फोंडा)-

उसगाव ते मोलेपर्यंतचा रस्ता चांगला आहे, पण वाहनांच्या वेगावर नियंत्रण हे महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे बऱ्याचदा दारूच्या सेवनामुळेही अपघात होत असल्याने पोलिसांनी त्यावर चाप ठेवणे आवश्‍यक आहे.

सूरज गरड (पिळये - तिस्क उसगाव)

उसगाव - मोलेपर्यंतच्या रस्त्यावर कायम अपघात होत असतात, त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. भरधाव वाहतुकीमुळे हे अपघात होत असल्याने विशेषतः पर्यटकांच्या वाहनांच्या वेगाचे नियंत्रण हे महत्त्वाचे ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com