Margao Municipality: नोकरभरती रद्दचा मुख्याधिकाऱ्यांचा आदेश, तर दिगंबर कामतांनी दिलंय नगराध्‍यक्षांना 'हे' आश्वासन

आदेश जारी : नगराध्‍यक्ष उद्विग्न; मुख्‍यमंत्र्यांना विचारणार जाब
Margao Municipal Council
Margao Municipal CouncilGomantak Digital Team
Published on
Updated on

Margao Municipality मडगाव नगरपालिकेने 43 पदे भरण्‍यासाठी जी नोकरभरती प्रक्रिया सुरू केली होती, ती सरकारी आदेशानुसार रद्द करण्‍यात आली आहे. तसा आदेश मडगाव पालिकेचे मुख्‍याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी जारी केला आहे.

त्‍यामुळे स्‍थगित ठेवलेली ही नोकरभरती आता पूर्णत: रद्द झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. दरम्‍यान, या प्रकारामुळे नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनी उघडपणे आपली नाराजी व्‍यक्त केली आहे.

मुख्‍याधिकारी शंखवाळकर यांनी नोकरभरती रद्द केल्‍याचा आदेश काल जारी केला होता. मात्र याची कल्‍पना आपल्‍याला कुणीही दिलेली नाही. ही प्रक्रिया रद्द झाल्‍याची माहिती मला बाहेरून मिळाली.

ज्‍या पदावरील कर्मचारी निवृत्त झाले आहेत, ती पदे भरायला नकोत का? असा सवाल नगराध्‍यक्ष शिरोडकर यांनी केला. नगरपालिका ही स्‍वायत्त संस्‍था असल्‍याने नोकरभरती करण्‍याचा अधिकार पालिकेलाच आहे आणि तसे आम्‍ही नगरपालिका प्रशासन संचालकांकडून आलेल्‍या पत्राला उत्तर देताना स्‍पष्‍ट केले होते, असेही ते म्‍हणाले.

8 कारकून, 1 गवंडी आणि 34 कामगारांची पदे भरण्‍यासाठी 8 ऑगस्‍ट रोजी मडगाव पालिकेने जाहिरात दिली होती. मात्र नगरविकासमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्‍या आदेशाने ही प्रक्रिया रद्द करण्‍यात आल्‍याचे 24 ऑगस्‍ट रोजी नगरपालिका संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी जाहीर केले.

त्‍यानंतर नगराध्‍यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आपण आपल्‍या पदाचा राजीनामा देईन असा इशारा दिल्‍यानंतर ही स्‍थगित ठेवलेली नोकरभरती प्रक्रिया पुन्‍हा सुरू केली जाईल असे आश्‍वासन त्‍यांना आमदार दिगंबर कामत यांनी दिले होते.

Margao Municipal Council
Military Engineering Services Goa: स्लॅब कोसळून कामगार जागीच ठार, मांगोरहील येथील दुर्दैवी घटना

नगरसेवकांचा डाव फसला

मडगाव नगरपालिकेतील नोकरभरती प्रक्रिया रद्द करण्‍यात आल्‍याने नगरसेवकांमध्‍येही संतापाचे वातावरण पसरले आहे. दोन नगरसेवकांनी या नोकरभरतीचा फायदा घेऊन आपल्‍या मुलींना पालिकेत कारकून म्‍हणून चिकटविण्‍याचे ठरविले होते. मात्र ही प्रक्रियाच रद्द झाल्‍यामुळे त्‍यांची ही संधी हातची गेली आहे.

Margao Municipal Council
37th National Games Goa 2023: राष्ट्रीय स्पर्धा कार्यक्रमावर क्रीडा संघटनांचा बहिष्कार

मडगाव पालिकेतील नोकरभरती रद्द करण्‍यात आल्‍याचा जाब आमदार दिगंबर कामत आणि मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारणार आहे. आमची पालिका सत्ताधारी पक्षाची असतानाही आमची कामे का होत नाहीत हेच कळत नाही. मडगावची कामे विनाव्‍यत्‍यय व्‍हावीत यासाठी आम्‍ही भाजपमध्‍ये प्रवेश केला होता.

- दामोदर शिरोडकर, नगराध्‍यक्ष (मडगाव)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com