Margao City: मडगावातील दोन रेस्‍टॉरंट पालिकेच्या रडारावर; दंड ठोठावत पालिकेने दिलाय 'हा' इशारा

Margao City: 5 हजार रुपयांचा दंड : पाणी सोडणे बंद न केल्‍यास वीज जाेडणी तोडण्‍याचा इशारा
Margao City
Margao CityDainik Gomantak
Published on
Updated on

Margao City: कुठल्‍याही प्रकारे प्रक्रिया न करता आपल्‍या हॉटेलचे सांडपाणी खुल्‍या नाल्‍यात सोडण्‍याचा आरोप असलेल्‍या मडगावातील बस स्‍टँड जवळ असलेल्‍या हॉटेल नवतारा आणि हॉटेल ऐरावत या दोन रेस्‍टॉरन्‍टना मडगाव पालिकेने नोटीस बजावली आहे.

उघड्या नाल्‍यात पाणी साेडल्‍यामुळे या दोन्‍ही हॉटेल्‍सना प्रत्‍येकी 5 हजार रुपये दंड ठोठावण्‍यात आला आहे.

प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाल्‍यात सोडल्‍यामुळे ते पाणी नदीत जाऊन पाणी दूषित होते असा आरोप करुन मुंबई उच्‍च न्‍यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्‍यात आली.

या संदर्भात पालिकेने नियम मोडणार्‍या आस्‍थापनां विराेधात कारवाई करावी अशी सूचना उच्‍च न्‍यायालयाने केली हाेती.

त्‍यानुसार चाैकशी केली असता ही दाेन हॉटेल्‍स आपले सांडपाणी थेट नाल्‍यात साेडतात हे दिसून आल्‍यावर आम्‍ही त्‍यांना नोटीस बजावली आहे अशी माहिती मडगावचे पालिकेचे मुख्‍याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी दिली.

Margao City
Kamdhenu Scheme Goa: 'पशुसंवर्धन'कडून महत्वाचा निर्णय; गायींना रस्‍त्‍यांवर सोडणाऱ्या मालकांवर आता...

या दोन्‍ही हॉटेल्‍सना नाल्‍यात सोडले जाणारे सांडपणी त्‍वरित बंद करावे अशी ताकीद दिली असून हा प्रकार बंद न झाल्‍यास त्‍यांची पाण्‍याची आणि वीजेचे कनेक्‍शन तोडण्‍यासाठी आरोग्‍य खात्‍याकडे तक्रार केली जाईल अशी माहिती शंखवाळकर यांनी दिली.

शहरातील इतर हॉटेल्‍स अशाप्रकारे सांडपाणी नाल्‍यात सोडण्‍याचे दिसून आल्‍यास त्‍यांच्‍यावरही कारवाई केली जाईल असे त्‍यांनी सांगितले.

Margao City
Candolim Murder Case: सूचनाच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ

रामनगरी येथील आस्‍थापनांचे पाण्‍याचे कनेक्‍शन ताेडले

रामनगरी येथे एका व्‍यावसायिक व निवासी प्रकल्‍पाचे सांडपाणी उघड्यावर वाहत असल्‍याने आज पाणी खात्‍याने या प्रकल्‍पात जी व्‍यावसायिक आस्‍थापने आहेत त्‍यांचे पाण्‍याचे कनेक्‍शन ताेडले.

व्‍यावसायिक आणि निवासी अशा एकंदर 195 जणांना यापूर्वी आरोग्‍य खात्‍याने नोटीस दिली होती.

ही नोटीस देऊनही हे प्रक़ार बंद न झाल्‍याने आरोग्‍य खात्‍याच्‍या आदेशानुसार ही कारवाई करण्‍यात आल्‍याची माहिती पाणी खात्‍याच्‍या अधिकार्‍यांनी दिली.

दरम्‍यान तोडलेले हे कनेक्‍शन पुन्‍हा सुरु करावे यासाठी आज पाणी खात्‍याच्‍या मडगाव कार्यालयावर मोर्चा आणला. मात्र ही कारवाई आराेग्‍य खात्‍याच्‍या आदेशानुसार करण्‍यात आल्‍याचे त्‍यांना सांगण्‍यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com