CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Kamdhenu Scheme Goa: 'पशुसंवर्धन'कडून महत्वाचा निर्णय; गायींना रस्‍त्‍यांवर सोडणाऱ्या मालकांवर आता...

Kamdhenu Scheme Goa: काही दिवसांपूर्वीच मुख्‍यमंत्री सावंत यांनी याबाबत तसे संकेत दिले आहेत.
Published on

Kamdhenu Scheme Goa: रस्‍त्‍यांवर फिरणाऱ्या गुरांचा त्रास वाढत असताना राज्‍य सरकार एक महत्त्‍वाचा निर्णय घेऊ पाहात आहे. कामधेनू योजनेअंतर्गत देण्‍यात येणाऱ्या गायींना चिप बसविण्‍यात येणार आहेत. पशुसंवर्धन खात्‍याकडून लवकरच त्‍याची अंमलबजावणी करण्‍यात येणार आहे.

उपरोक्‍त योजनेअंतर्गत घेतलेली गाय रस्‍त्‍यांवर सोडलेली आढळल्‍यास त्‍याद्वारे संबंधित मालकावर कारवाईही होऊ शकते. काही दिवसांपूर्वीच मुख्‍यमंत्री सावंत यांनीही तसे संकेत दिले आहेत.

गायींना चिप बसवल्‍यानंतर त्‍याचा मालक कोण याची तत्‍काळ माहिती उपलब्‍ध होऊ शकणार आहे. त्‍यामुळेच मालक गायींची योग्‍य प्रकारे काळजी घेऊ शकतील, असा विश्‍‍वास पशुसंवर्धन खात्‍याला आहे. अनेकदा रस्‍त्‍यांवर गुरे सोडलेली आढळतात.

त्‍यामुळे अपघातही घडतात. हे टाळण्‍यासाठी सरकारकडून काही उपाययोजना आखण्‍यात येत आहेत. कोंडवाडा योजनेचीही कटाक्षाने अंमलबजावणी करण्‍यासाठी सूचना देण्‍यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

CM Pramod Sawant
Vasco Drugs Case: कांदोळी, हणजूण पाठोपाठ वास्कोत छापोमारी; परप्रांतियाकडून साठ हजाराहून अधिक रकमेचा गांजा जप्त

पशुधन क्षेत्रातील प्रगतीचा थेट संबंध ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संतुलित विकासाशी आणि समाजातील गरीब घटकांच्या उन्नतीशी आहे.

यामुळेच कामधेनू ही योजना सुरु करण्यात आली असून दूध उत्पादकांचा सहभाग वाढवणे हा या मागचा आहेस आहे. दुग्धव्यवसायाकडे उत्पन्नाचा एक स्रोत म्हणून पाहिल्यास समाजातील दुर्बल घटकांना या व्यवसायाद्वारे दिलासा मिळू शकतो.

CM Pramod Sawant
PM Narendra Modi: मोदींची सभा! भाजप प्रचाराचे रणशिंग फुंकणार; शक्तिप्रदर्शनासाठी कार्यकर्ते सज्ज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com