Margao Municipal News: मुरगाव पालिकेच्या तिजोरीत खडखडाट !

Margao Municipal News: वसुली रखडल्याने नामुष्की : कामगार वेतनासाठी काढली 40 लाखांची सुरक्षा ठेव
Margao Municipal Council | Goa News
Margao Municipal Council | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Margao Municipal News: मुरगाव पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक व रोजंदारीवरील कामगार यांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्यासाठी सुरक्षा ठेव खात्यातील 40 लाख रुपये काढून मुरगाव पालिकेने कामगारांचे वेतन जमा केले. थकबाकी वसुली रखडल्याने ही नामुष्की ओढवल्याची चर्चा आहे.

''अ'' वर्गाच्या पालिकेच्या तिजोरीत खडखडाट होण्यामागील कारण काय असावे, याबाबत येथे उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. पालिकेची जी थकबाकी आहे, ती मोठी मोहीम राबवून वसूल करण्याची गरज आहे.

तथापि काही वेळा मोहीम राबविली जाते, गरजेपुरती थकबाकी रक्कम वसूल झाली,की पुन्हा सामसूम होते, असे चित्र दिसत आहे. नियंत्रण नसल्याने पालिकेचे भयच नष्ट झाल्याचा दावा नगरसेवक दीपक नाईक यांनी केला आहे.

पालिकेला वेतनासाठी सतत धावपळ करावी लागत असल्याचे चित्र काही महिन्यांपासून सुरू आहे. आपले महिन्याचे वेतन कधी हातात पडेल, यांची वाट कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना पाहावी लागते.

तसेच ऑक्टोबरच्या वेतनाबाबत तसेच झाले. त्यांना 10 तारखेपर्यंत वेतन मिळाले नव्हते. ते कधी मिळेल हे सांगता येत नसल्याचे कामगारांना धास्ती होती. कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, रोजंदारीवरील कामगारांचे वेतन देण्यासाठी रक्कम नसल्याचे लेखा विभागाने कळविले होते.

Margao Municipal Council | Goa News
Speaker Ramesh Tawadkar: काँग्रेसच्या 'त्या' 8 आमदारांचा फैसला 15 ते 20 दिवसांत

कर्मचारी वर्गासाठी 70 लाख, निवृत्ती वेतनधारकांसाठी अंदाजे 14 लाख, रोजंदारी कामगारांसाठी अंदाजे 15 लाख रुपये असे सुमारे 99 लाख रुपये वेतनापायी मुरगाव पालिकेला दरमहा लागतात. परंतु सध्या मुरगाव पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने एवढी मोठी रक्कम कशी व कोठून आणावी हा प्रश्न पडतो.

‘त्यांना’ पोटभाडेकरूंकडून भरमसाट भाडे !

मुरगाव पालिकेच्या दुकाने घेतलेले भाडेकरू त्यांनी ठेवलेल्या पोटभाडेकरूकडून मोठ्या रकमेचे भाडे घेतात. अन् पालिकेला वर्षांकाठी फक्त पाच हजार रुपये भाड्यापायी फेडतात. जे मुरगाव पालिकेचे भाडेकरू आहेत, त्यांना बाजारभावाप्रमाणे भाडे लागू करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करीत आहे. तो कायदा आल्यास पालिका स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नसल्याचा दावा नगरसेवक दीपक नाईक यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com