Margao Municipal Corporation: मडगाव पालिकेकडून ‘एसजीपीडीए’ला 50 हजारांचा दंड; मासळी मार्केटमधील 'तो' प्रकार आला समोर

मार्केटच्या आसपासच्या शेतांमध्ये गोळा झालेल्या मिश्रित कचऱ्यांच्या ढिगाऱ्यावरून 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Margao Municipal Corporation
Margao Municipal CorporationDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Municipal Corporation: उच्च न्यायालयाने एसजीपीडीएच्या किरकोळ मासळी मार्केटमधील अस्वच्छतेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर मडगाव नगरपालिकेने एसजीपीडीएला मार्केटच्या आसपासच्या शेतांमध्ये गोळा झालेल्या मिश्रित कचऱ्यांच्या ढिगाऱ्यावरून 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम 24 तासांच्या आत भरावी, असे मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी एसजीपीडीएला बजावले आहे.

Margao Municipal Corporation
Goa Assembly Monsoon Session : केक, वीड ब्राऊनीमधून ड्रग्जविक्री ; पेस्ट्री दुकानांची तपासणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मार्केटमध्ये जो कचऱ्याचा ढीग झालेला आहे, तो सुका व ओला कचरा, असा वेगवेगळा केलेला नाही. तो मिश्रित कचरा असल्याने नगरपालिकेला उचलणे शक्य होत नसल्याचे नोटिशीत म्हटले आहे. यापुढे एसजीपीडीएने किरकोळ मासळी मार्केटमधील कचरा सुका व ओला असा वेगवेगळा करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Margao Municipal Corporation
Aldona Village Panchayat: हळदोणा पंचायतीला खंडपीठाने दिले 1.10 लाख जमा करण्याचे निर्देश; 'ही' दिरंगाई सदस्यांना भोवली

नगरपालिकेने किरकोळ मासळी मार्केटची पाहणी 17 जुलै रोजी केली होती. मग नोटीस पाठवायला नगरपालिकेला एवढा उशीर का? नोटीस न पाठवता चर्चेद्वारे हा विषय सुटला नसता का?

कचऱ्या संदर्भात आमदार, नगरपालिका, विक्रेते, कंत्राटदार यांची संयुक्त बैठक बोलावली जाईल, असे एसजीपीडीएचे अध्यक्ष साळकर यांनी स्पष्ट केले, असताना नोटीस पाठवण्याची एवढी गरजच होती का? उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानेच ही नोटीस पाठवण्यात आली का? हे प्रश्र्न उपस्थित होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com