Margao October Heatwave: मडगावकरांचा ऑक्टोबर हिटने काढला घाम! पारा 37.7 अंशांवर, अवघ्या दोन तास चाळीस मिनिटांत तापमानात तीन अंशांची वाढ

margao temperature October heatwave: ऑक्टोबर महिना संपत आला, तरी मडगावातील उन्हाचा तडाखा कमी होण्याऐवजी अधिकच तीव्र होत असल्याचे सोमवारी दिसून आले.
Margao October Heatwave
Margao October HeatwaveDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: ऑक्टोबर महिना संपत आला, तरी मडगावातील उन्हाचा तडाखा कमी होण्याऐवजी अधिकच तीव्र होत असल्याचे सोमवारी दिसून आले. शहरातील तापमानाने तब्बल ३७.७ अंश सेल्सिअसची पातळी गाठली, तर शरीराला जाणवणारी उष्णता ४०.४ अंशांपर्यंत पोहोचली.

ऑक्टोबरमध्ये मडगावचे (Margao) सामान्य कमाल तापमान सुमारे ३१ अंश सेल्सिअस असल्याचे मानल्यास सोमवारची नोंद त्यापेक्षा तब्बल ६.७ अंशांनी अधिक आहे. विशेष म्हणजे, हा वाढता उष्णतेचा तडाखा कोणत्याही अंदाजावर नव्हे, तर मडगावात गेली बारा वर्षे कार्यरत असलेल्या एका खासगी स्वयंचलित हवामान केंद्राच्या प्रत्यक्ष नोंदींवरून समोर आला आहे.

Margao October Heatwave
Goa Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात कुचराई! पालिकांना कोर्टाचा दणका; अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईचे आदेश

मडगावचे अभियंता, उद्योजक आणि हवामान निरीक्षक अतुल नाईक यांनी २०१४ पासून सातत्याने चालविलेल्या वैयक्तिक हवामान केंद्राने सोमवारच्या असामान्य उष्णतेची नोंद केली. वेदर अंडरग्राउंड या आंतरराष्ट्रीय हवामान माहिती मंचावर IMARGA127 या संकेतांकाने नोंदणीकृत असलेल्या त्यांच्या केंद्रातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सकाळी साडेअकरा नंतर तापमान झपाट्याने वाढत गेले आणि दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांनी ३७.७ अंशांवर पोहोचले.

Margao October Heatwave
Goa Politics: 'वीरेश बोरकरांनी चोडणकरांकडून तीन कोटी घेतले', अजय खोलकरांच्या आरोपाने गोव्यात खळबळ; 'आरजी'तील अंतर्गत कलह विकोपाला

दरम्यान, मडगावमध्ये ऑक्टोबरच्या उत्तरार्धातही तीव्र उष्णतेची नोंद झाली. सकाळी ११.२९ वाजता ३४.७ अंश असलेले तापमान दुपारी २.०९ वाजता ३७.७ अंशांवर पोहोचले. अवघ्या दोन तास ४० मिनिटांत तापमानात तीन अंशांची वाढ झाली. यावेळी जाणवणारी उष्णता ४०.४ अंश होती. सापेक्ष आर्द्रता ५३ टक्क्यांवरून ३४ टक्क्यांपर्यंत घसरली, तर वाऱ्याचा वेग ताशी केवळ १.८ किलोमीटर होता. दुपारी तीनच्या सुमारास तापमान ३६.७ अंशांवर आले. ऑक्टोबरमधील सामान्य कमाल तापमान सुमारे ३१ अंश मानता, सोमवारची नोंद लक्षणीय अधिक आहे. मात्र हा अधिकृत ऐतिहासिक उच्चांक आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी जुन्या नोंदींची तुलना आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com