Francisco Sardinha
Francisco SardinhaDainik Gomantak

Goa News: धान्याच्या काळाबाजारप्रकरणी सरकारचा दोष नाही- फ्रान्सिस सार्दिन

Goa News: सरकारने रेशनमधील काळाबाजार करणाऱ्यांना पकडले असून कारवाई व तपास सुरु केला आहे.
Published on

Goa News: धान्याचा काळाबाजार होत असल्याचे उघडकीस आले. त्याबद्दल सरकारला किंवा नागरी पुरवठा खात्याला दोष देता येणार नाही. नागरी पुरवठा खात्यातून रास्त भावाच्या दुकानांमध्ये धान्य नेत असताना हे प्रकार घडलेले आहेत. यात रास्त भाव दुकानवाल्यांचा हात असण्याची शक्यता खासदार सार्दिन यांनी व्यक्त केली.

सरकारने रेशनमधील काळाबाजार करणाऱ्यांना पकडले असून कारवाई व तपास सुरु केला असल्याचे सार्दिन यांनी आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ही घटना म्हणजे सरकारने डोळे उघडण्यासाठी उपयोगी पडेल.

अशा घटना यापुढे घडू नये, म्हणून सरकारने कडक पावले उचलली पाहिजेत. कृषिमंत्र्यांनी शेती व्यवसायाला प्राधान्य देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या व्यावहारिक होण्यासंदर्भात योजना सुरू केल्या पाहिजेत, असेही सार्दिन म्हणाले.

Francisco Sardinha
Goa Crime News: गोव्यात ड्रग्सचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर; ओव्हरडोसमुळे महिलेची प्रकृती बिघडली

दोन महामंडळांवर सार्दिन यांची निवड

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (भारतीय अन्न महामंडळ) व बीएसएनएल (भारत संचार निगम लिमिटेड) गोवा विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे सार्दिन यांनी स्वतः सांगितले. धान्य पुरवठ्यात सुसुत्रता आणण्यासाठीच्या उपाययोजनांवर विचार विनिमय केला जाईल, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com