Goa Crime News: गोव्यात ड्रग्सचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर; ओव्हरडोसमुळे महिलेची प्रकृती बिघडली

Goa Crime News: पोलिसांकडून कारवाई केली जाते, तरी ड्रग्स माफियांची साखळी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: राज्यातील ड्रग्स व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी गोव्यात पर्यटकांना ड्रग्स सहजपणे उपलब्ध होत आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात असली तरी ड्रग्स माफियांची साखळी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. वागातोर येथील एका पार्टीत सहभागी झालेल्या वाराणसीतील महिला पर्यटकाची प्रकृती गंभीर बनल्याने ड्रग्सचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वाराणसी येथून मित्रासोबत गोव्यात आलेल्या तरुणीने ड्रग्सचे अतिसेवन केल्यामुळे ती सध्या खासगी इस्पितळात उपचार घेत आहे. त्यामुळे गोव्यात रात्री उशिरापर्यंत सुरुअसलेल्या पब्स तसेच डान्स पार्ट्यांमध्ये ड्रग्स उपलब्ध होत असल्याचा हा सज्जड पुरावा आहे.

Goa Crime News
Goa Government: चिरे अन् वाळू उत्खननास परवानगी; तर कॅसिनोंना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ

किनारपट्टी भागातील ड्रग्स विक्रेत्यांसह हॉटेलमधील काही कर्मचारीही या साखळीत गुंतल्याचे सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणातून उघड झाले आहे. या घटनेनंतर सरकारने ड्रग्स दलाल व विक्रेत्यांविरुद्ध मोहीम राबवली होती. दरदिवशी गुन्हेही नोंद होत असले तरी जप्त केलेले ड्रग्स हे राज्यात होणाऱ्या उलाढालींचे केवळ हिमनगाचे टोक आहे.

तिघांवर गुन्हा नोंद

वाराणसीहून गोव्यात दाखल झालेल्‍या तरुणीने ड्रग्सचे अतिसेवन (ओव्‍हर डोस) केल्‍याने ती अत्‍यवस्‍थ झाली. सध्या तिच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. कळंगुट पोलिसांनी ड्रग्स पुरवठादार अनोळखी व्यक्तीसह तरुणी सारा खान आणि डॉ. अभिषेक विक्रम सिंग या तिघांविरुद्ध अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत हे करत आहेत.

अमित घावटे, विभागीय अधिकारी, एनसीबी-

परदेशातून येणारे ड्रग्स हे गोव्यात पुरवठा करण्यासाठी पाठवले जात असल्याने गोवा हे ड्रग्स विक्री केंद्र बनले आहे. ड्रग्स व दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ‘एनसीबी’ची गोव्यात गरज आहे. विमानतळ, बंदरे तसेच कुरियरमार्फत ड्रग्ज व्यवहार होत असल्याने त्याच्या शोधाला प्राधान्य दिले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com