Goa Ganesh Chaturthi: चिकण मातीच्या मूर्तींना गणेशभक्तांची पसंती; मूर्तीचे भाव वधारले

पीओपीच्या मूर्तींना मागणी घटली : मडगावात मोठ्या प्रमाणात मूर्ती दाखल
Goa Ganesh Chaturthi: चिकण मातीच्या मूर्तींना गणेशभक्तांची पसंती; मूर्तीचे भाव वधारले
Published on
Updated on

Goa Ganesh Chaturthi गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असल्याने वातावरण मंगलमय होऊ लागले आहे. मडगाव परिसरातील विविध चित्रशाळांत सुबक व देखण्या गणेशमूर्ती लक्ष वेधत आहेत. चिकण मातीच्या मूर्तींना गणेशभक्त पसंती देत आहेत.

Goa Ganesh Chaturthi: चिकण मातीच्या मूर्तींना गणेशभक्तांची पसंती; मूर्तीचे भाव वधारले
Churchill Alemao Resignation: चर्चिल आलेमाव यांची TMC मधून एक्झिट!

पीओपीच्या मूर्तींना मागणी नसल्याने बहुतेक चित्रशाळेत चिकण मातीच्या मूर्तीच अधिक दिसून येत आहेत. मडगाव परिसरात अनेक चित्रशाळांत मोठ्या प्रमाणात मूर्ती विक्रीसाठी ठेवल्या आहेत.

आगाऊ नोंदणीही सुरू झाली आहे, अशी माहिती चित्रशाळा मालकांनी दिली. गणेशभक्तांची मागणी ध्यानात घेऊन यंदा चित्रशाळेत लहान मूर्ती जास्त प्रमाणात उपलब्ध केल्या आहेत. मोठ्या आकाराच्या मूर्ती सार्वजनिक गणेश उत्सवासाठी उपलब्ध केल्या आहेत.

Goa Ganesh Chaturthi: चिकण मातीच्या मूर्तींना गणेशभक्तांची पसंती; मूर्तीचे भाव वधारले
Fishing Business in Goa: हंगाम सुरु, मात्र गोवेकरांना अजून काही दिवस करावी लागणार मासळीची प्रतीक्षा

मूर्ती महागल्या

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तीचे भाव वाढले आहेत. मूर्ती बनविण्‍यासाठी लागणाऱ्या साहित्‍याचे दर वाढल्‍याने दुसरा पर्याय नाही, असे काही चित्रशाळा चालकांनी सांगितले.

यंदा लहान आकाराची मूर्ती 400 रुपयांपासून सुरू होत आहे. मोठ्या आकाराच्या मूर्तीचा दर 10 ते 12 हजार रुपयांपर्यंत आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com